आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्दैवी घटना:पिकांना पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, वसमत तालुक्यातील घटना

हिंगोली9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वसमत तालुक्यातील पळशी शिवारामध्ये शेतात विद्युत पंप सुरू करण्यासाठी गेलेल्या तरुण शेतकऱ्यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी हट्टा पोलीस ठाण्यात गुरुवारी तारीख 12 सायंकाळी उशिरा अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राजाराम सीताराम डांगरे ( 38) असे तरुण शेतकऱ्याचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजाराम डोंगरे यांचे वसमत तालुक्यातील पळशी शिवारामध्ये शेत आहे. सध्या शेतात जनावरांसाठी चाऱ्याचे पीक घेण्यात आले आहे. सध्या विज वितरण कंपनीकडून भारनियमन केले जात असल्याने रात्रीच्या वेळी विज पुरवठा सुरू राहत आहे. त्यामुळे शेतात पिकांना पाणी देण्याची कामे रात्री करावी लागत आहेत.

दरम्यान राजाराम डांगरे हे बुधवार ता. 11 मध्यरात्री शेतात चारा पिकांना पाणी देण्यासाठी गेले होते. यावेळी विद्युत पंप सुरू करण्यासाठी त्यांनी बटन सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी त्यांना विजेचा धक्का लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी राजाराम हे घरी आले नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी शेतात जाऊन पाहणी केली असता त्यांचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी भानुदास डांगरे यांच्या माहिती वरून हट्टा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सोनटक्के पुढील तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...