आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Hingoli
  • A Man Was Killed For A Minor Reason In Yeli Shivara Of Hingoli, A Case Was Registered In Aundha Police Station; Two Arrested By Hingoli Police

येळी शिवारात क्षुल्लक कारणावरून एकाचा खून:औंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल; हिंगोली पोलिसांकडून दोघांना अटक

हिंगोली16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औंढा नागनाथ तालुक्यातील येळी शिवारात एका तरुणाचा क्षुल्लक कारणावरून खून झाल्याचा प्रकार उघडकिस आला असून या प्रकरणी दोघांवर बुधवारी ता. 18 पहाटे खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात औंढा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येळी येथील गजानन अंकूश नागरे (35) हा रविवारी ता. 15 रात्री मित्रा सोबत येळी शिवारातील आखाड्यावर गेला होता. त्याठिकाणी त्याचा गोपिचंद मारोती आव्हाड याच्या सोबत किरकोळ कारणावरून वाद सुरु झाला. सदर वाद तेथे असलेल्या दामोदर भागोजी नागरे याने सोडविला. मात्र काही वेळातच पुन्हा वाद सुरु होऊन गोपिचंद याने गजानन यास मारहाण केली. यामुळे गजानन यास गंभीर दुखापत होऊन तो जागीच कोसळला. या प्रकारानंतर सोमवारी ता. 16 सकाळी गोपिचंद व दामोदर गावात निघून आले. दुपारच्या वेळी दामोदर याने आखाड्यावर जाऊन पाहिले असता गजानन हालचाल करीत नसल्याचे दिसून आला. यामुळे घाबरलेल्या दामोदर याने गोपिचंद यास माहिती दिली. दोघेही पुन्हा आखाड्यावर आले अन त्यांनी गजानन याचा मृतदेह ओढत नेऊन इतर ठिकाणी असलेल्या शेतातील हळदीच्या पिकात फेकून दिला.

दरम्यान, मुलगा बेपत्ता असल्याने मयत गजानन याच्या कुटुंबियांनी त्याचा शोध सुरु केला होता. यावेळी गजानन याचा मृतदेह एका शेतातील हळदीच्या पिकात असल्याची माहिती मिळाल्यावरून गजानन याचे वडिल अंकूश नागरे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी गजानन याचा मृतदेह आढळून आला. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर औंढा नागनाथ पोलिस ठाण्याचे निरीक्षक विश्‍वनाथ झुंजारे, जमादार संदीप टाक यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पोलिसांनी घेतलेल्या अधिक माहिती मध्ये त्याचा खून झाल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी अंकूश नागरे यांनी आज पहाटे दिलेल्या तक्रारीवरून औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी गोपिचंद आव्हाड व दामोदर नागरे यास अटक केली आहे.

बातम्या आणखी आहेत...