आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Hingoli
  • A Minor Girl Was Abducted And Threatened With Suicide; 1 Arrested, After Three Months The Girl Was Caught And Taken Into The Custody Of Her Family

आत्महत्येची धमकी देत अल्पवयीन मुलीला पळवून अत्याचार; 1 अटकेत:तीन महिन्यांनंतर मुलीला पकडून दिले कुटुंबीयांच्या ताब्यात

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड येथे ओळख झाल्यानंतर एक तरुण अल्पवयीन मुलीशी मोबाइलवर सतत बोलत होता. त्यानंतर व्हिडिओ कॉल करून “तू माझ्या सोबत आली नाही तर आत्महत्या करीन,’ अशी धमकी देऊन कळमनुरी तालुक्यातील रुपूर येथील मुलीला पुणे येथे नेऊन अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. आखाडा बाळापूर पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी नांदेड येथील शेख अरबाज ऊर्फ बाबू शेख जुबेर (रा. गोपाळनगर, सावंगी, नांदेड) यास पोलिसांनी सोमवारी (३१ ऑक्टोबर) अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील रुपूर येथील एक अल्पवयीन मुलगी काही दिवसांपूर्वी नांदेड येथे तिच्या नातेवाइकांकडे गेली होती. त्या ठिकाणी तिची शेख अरबाज याच्याशी अोळख झाली. त्यानंतर ते मोबाइलवर बोलू लागले. मात्र नातेवाइकांकडून रुपूर येथे परत आल्यानंतर शेख अरबाजने त्या मुलीशी संभाषण सुरूच ठेवले. मुलगी आपल्या जाळ्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने २३ जुलै २०२२ रोजी त्या मुलीला व्हिडिओ कॉल करून इमारतीवरून उडी मारून आत्महत्या करण्याची धमकी दिली. त्यामुळे ती मुलगी त्याच्या सोबत गेली.

दरम्यान, त्या मुलीच्या कुटुंबीयांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात दिली. यावरून सहायक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, उपनिरीक्षक शिवाजी बोंडले यांच्या पथकाने त्या मुलीचा शोध सुरू केला. दोन दिवसांपूर्वीच दोघेही नांदेडला आल्यानंतर दोघांनाही ताब्यात घेतले.

बातम्या आणखी आहेत...