आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणीच्या धर्मांतरासाठी आरोपीला इतरांचीही मदत:पोलिसांचे पथक फरिदाबादला जाणार, शपथपत्रासाठी मदत करणाऱ्या महिलेचा घेणार शोध

हिंगोली12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कळमनुरी तालुक्यातील रेडगाव येथे तरुणीवर धर्मांतरासाठी दबाव आणल्याचा प्रकरणात आणखी काही जणांनी मदत केल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न होत आहे. तर फरिदाबाद (दिल्ली) येथे खोलीसाठी तसेच शपथपत्रासाठी एका महिलेने मदत केल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांचे पथक लवकरच फरिदाबाद येथे रवाना होणार आहेत.

आता या प्रकरणात आणखी किती जणांचा सहभाग आहे याची माहिती महिलेच्या चैाकशीनंतरच मिळणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

कळमनुरी तालुक्यातील रेडगाव येथील एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून जवळा पांचाळ येथील साजीद पठाण या तरुणाने पळवून नेले. त्यानंतर त्याने तरुणीवर अत्याचार केले. तसेच फरिदाबाद येथे नेऊन त्या ठिकाणी दोघांनी लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहण्याचे शपथपत्र देखील तयार केले. त्यांचा फरिदाबाद येथे सुमारे 20 ते 22 दिवस मुक्काम होता.

दरम्यान, त्या ठिकाणी साजीद याने भाडेतत्वावर खोली घेतली होती. त्या ठिकाणी सर्व कागदपत्रे जमा करून त्यांनी शपथपत्र तयार केले. त्यासाठी त्यांना एका महिलेने मदत केल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. या शिवाय साजीद सोबत रेडगाव भागातून एक तरुण गेला होता. त्यामुळे आता पोलिसांनी त्या तरुणाचा शोध सुरू केला आहे. तसेच महिलेचा जबाव नोंदविण्यासाठी पोलिसांचे पथक लवकरच फरिदाबाद येथे जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपाधिक्षक किशोर कांबळे, आखाडा बाळापूरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, उपनिरीक्षक श्रीधर वाघमारे, जमादार शेख बाबर यांचे पथक रवाना होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. त्या महिलेच्या जवाबानंतरच या प्रकरणात आणखी काही जणांचा समावेश होता का? हे स्पष्ट होणार आहे. तर त्या महिलेने यापुर्वी किती जणांना शपथपत्रासाठी मदत केली ही बाब देखील उघडकीस येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...