आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:हिंगोली जिल्ह्यात भरधाव बसची दुचाकीला धडक; 1 ठार, 1 जखमी

हिंगोली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जांभरूण आंध ते भोसी मार्गावर जांभळी फाट्याजवळ भरधाव बसने दुचाकीला धडक दिल्याने अपघात झाला. यात एक ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी स. १० वाजता घडली. मारुती खोबराजी जुमडे (रा. जांभरूण आंध) असे मृताचे नाव आहे. मारुती जुमडे व त्यांचे मित्र सूरज प्रकाश जुमडे हे दोघे दुचाकीवर जांभरूण आंध येथून भोसी येथे मासे आणण्यासाठी निघालेे होते. हिंगोलीहून खिल्लारकडे जाणाऱ्या बसने (एमएमच २० बीएल ११०८) दुचाकीला धडक दिली. यात मारुती जुमडे यांचा जागीच मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...