आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:खानापूरचित्ता येथे अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

हिंगोली19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली ते कळमनुरी मार्गावर खानापूर चित्ता येथे भरधाव वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी ता.2 सकाळी 7.30 वाजता घडली आहे. गजानन पांडुरंग पारखे (25, रा. पिंपरखेड) असे मृत व्यक्तीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली तालुक्यातील पिंपरखेड येथील गजानन पारखे हे त्यांच्या दुचाकी वाहनावर आज सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास पिंपरखेड येथून त्यांच्या नातेवाईकाकडे हिंगणी येथे जात होते. सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास त्यांचे दुचाकी वाहन खानापूर चित्ता शिवारात आले असताना राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगाने धावणार्‍या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये गजानन यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच बासंबा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व्हि.डी. श्रीमनवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मगन पवार, जमादार मदन गव्हाणे यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मयत गजानन यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केला आहे.

दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मयत गजानन यांचा एक महिन्यापूर्वीच विवाह झाला होता. या घटनेमुळे पारखे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मयत गजानन यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ असा परिवार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...