आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोलीतील तरुणास अटक:‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या तरुणीवर धर्मांतरासाठी दबाव, धमकी

हिंगोली12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशभरात श्रद्धा प्रकरण गाजत असताना जिल्ह्यातही रेडगाव येथील २१ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेऊन अत्याचार केल्याचा, त्यानंतर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचे शपथपत्र तयार केल्याचा तसेच धर्मांतरासाठी दबाव टाकून ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. तरुणीच्या तक्रारीवरून साजिद रफिकखाँ पठाण (रा. जवळा पांचाळ) या तरुणाविरुद्ध आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी त्याला अटक केली.कोर्टाने त्याची २३ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली.

कळमनुरी तालुक्यातील रेडगाव येथील एका तरुणीला जवळा पांचाळ येथील साजिद रफिकखाँ पठाण याने लग्नाचे आमिष दाखवून ८ जुलै २०२२ रोजी पळवून नेले. कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेऊनही ती सापडली नाही. कुटुंबीयांनी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याचा अर्ज दिल्यानंतर पोलिसांनी तिचा शोध सुरू केला होता. साजिदने त्या तरुणीला डोंगरकडा, जवळाबाजार, औरंगाबाद, फरिदाबाद (दिल्ली) येेथे नेऊन अत्याचार केला. त्यानंतर फरिदाबाद येथेच लिव्ह इन रिलेशनशिपचा बाँड तयार केला. सप्टेंबर महिन्यात ते परत डोंगरकडा येथे येऊन राहू लागले. साजिदने तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव आणला. मात्र तरुणीने धर्मांतरास विरोध केल्यानंतर तिला त्रास देऊन ठार मारण्याची धमकी देण्यात आली.

त्यामुळे तरुणीने साजिदला सोडून देत घर गाठत हा प्रकार कुटुंबीयांना सांंगितला. मात्र कुटुंबीयांनी बदनामीच्या भीतीने कुठेही वाच्यता केली नाही. तरीही साजिदचे त्रास देणे सुरूच होते. अखेर या त्रासाला कंटाळून कुटुंबियांनी शुक्रवारी (१८ नोव्हेंबर) रात्री आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी साजिद पठाण याच्याविरुद्ध अत्याचार व इतर कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी साजिदला रात्रीच ताब्यात घेतले.

अशी झाली दोघांची ओळख या प्रकरणातील साजिद पठाण सेंटरिंगचे काम करीत होता. त्याने रेडगाव येथे एका ठिकाणी काम घेतले होते. तेथे जाणे-येणे सुरू झाल्यानंतर त्याची समोरच राहणाऱ्या तरुणीशी ओळख झाली. साजिदने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले अन् तिला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले.

फरिदाबाद येथे शपथपत्र
दोघांनीही फरिदाबाद येथे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याबाबत शपथपत्र तयार केले. त्यानंतरच ते डोंगरकडाला आले. आखाडा बाळापूर पोलिसांच्या चौकशीत त्यांनी शपथपत्र दाखवले. पोलिसांनी तेव्हा नोंदवलेल्या जबाबात तरुणीने साजिदसोबतच राहणार असल्याचे सांगितले होते.

बातम्या आणखी आहेत...