आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचे वक्तव्य:खासदार संजय राऊत हिंगोलीत आले असते तर चांगले पाहिले असते

हिंगाेली13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • , स्वीय सहायकाची केली पाठराखण

खा. संजय राऊत भारत जोडो यात्रेत सहभागी झाले याकडे कसे बघता, असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला असता, ते हिंगोलीत आले असते तर चांगले बघितले असते, असे वक्तव्य हिंगोलीचे पालकमंत्री तथा कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केले. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी ते आज हिंगोलीत दाखल झाले होते. या वेळी शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. धनुष्यबाण हे पक्षचिन्ह कुणाला मिळेल, या प्रश्नावर त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना यांच्याकडेच पक्षचिन्ह राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र याबाबत न्यायालय निर्णय देणार असून त्यावर अधिक बोलणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

हिंगोली लोकसभेच्या जागेवर शिवसेनेचाच दावा राहणार आहे. लोकसभेची जागा आमची होती अन् राहणार असून यात तिळमात्र शंका नाही. या लोकसभेसाठी विद्यमान खासदार हेमंत पाटील हेच शिवसेनेकडून (बाळासाहेबांची शिवसेना) निवडणूक लढवतील, असा दावा सत्तार यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...