आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हिंगोलीत आले असते तर चांगले बघितले असते, असे वक्तव्य हिंगोलीचे पालकमंत्री तथा कृषीमंत्री अब्दूल सत्तार यांनी केले आहे. खासदार संजय राऊत जम्मू-काश्मिरात भारत जोडो यात्रेत सहभागी झाले, याकडे कसे बघता? असा प्रश्न पत्रकारांनी केला असता अब्दुल सत्तार यांनी हे उत्तर दिले आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी अब्दुल सत्तार आज हिंगोलीत दाखल झाले होते. यावेळी शासकिय विश्रामगृहाच्या परिसरात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सुप्रिया सुळेंबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन अब्दुल सत्तार यांच्या राज्यभरात टीकेची झोड उठली होती. आता संजय राऊत यांना बघितले असते, असे वक्तव्य केल्याने पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
धनुष्यबाण शिंदे गटालाच मिळणार
धनुष्यबाण पक्षचिन्हाबाबत आज केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी होत आहे. यावर धनुष्यबाण कोणाला मिळेल? या प्रश्नावर अब्दुल सत्तार म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला म्हणजेच बाळासाहेबांची शिवसेना यांच्याकडेच धनुष्यबाण राहिल. मात्र, याबाबत निवडणूक आयोग, न्यायालय निर्णय देणार आहे. त्यामुळे यावर अधिक बोलणार नसल्याचेही अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले.
हिंगोली लाकसभेची जागा शिंदे गटाचीच
हिंगोली लोकसभेच्या जागेवर शिंदे गटाचाच दावा राहणार, असेही अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले. अब्दुल सत्तार म्हणाले, हिंगोली लोकसभेची जागा शिवसेनेची होती अन राहणार. यात तिळमात्र शंका नाही. या लोकसभेसाठी विद्यमान खासदार हेमंत पाटील हेच शिवसेनेकडून (बाळासाहेबांची शिवसेना) निवडणुक लढवतील. त्यांच्या विजयासाठी आपण स्वतः व आमदार संतोष बांगर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी काम करतील व ते विजयी होतीलच, असा दावा सत्तार यांनी केला.
कुणी कुठे जायचे, हा त्याचा प्रश्न
खासदार संजय राऊत आज हिंगोलीत आले असते तर चांगले बघितले असते, असे वक्तत्व केल्यानंतर शेवटी कोणी कुठे जायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न असल्याचेही अब्दुल सत्तार म्हणाले. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विकास कामांचे नियोजन व २५ जानेवारी रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय बैठकीत जास्तीत जास्त निधी हिंगोली जिल्ह्याला मिळवून देऊन जिल्ह्याचे रखडलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार, असे अब्दुल सत्तार म्हणाले.
स्वीय सहाय्यक ठाकणेंची पाठराखण
जिल्ह्यातील ३५ कोटींच्या कामांना स्थगिती देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. स्वीय सहाय्यक ठाकणे यांनीच अधिकाऱ्यांना स्थगितीबाबत कळविले असून याची ऑडिओ क्लीप व्हायरल होत आहे, असे विचारतात अब्दुल सत्तार यांनी उत्तर देण्याचे टाळत काढता पाय घेतला. त्यातून स्वीय सहाय्यक ठाकणे यांची पाठराखण केल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा
आमदार संजय गायकवाड यांची शेतकऱ्याला शिवीगाळ:'मी 40 वर्षे काम केले, तू मला शिकवतोय का?', ऑडिओ क्लिप व्हायरल
शिंदे गटाचे बुलढाणा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यामध्ये संजय गायकवाड एका शेतकऱ्याला शिवीगाळ करत असल्याचे समोर आले आहे. ऑडिओ क्लिपनुसार उपसा जलसिंजन योजनेच्या रखडलेल्या कामाबाबत अनिल गंगितरे या शेतकऱ्याने आमदार संजय गायकवाड यांना फोन केला होता. बोदवड उपसा जलसिंजन कधी पूर्ण होणार?, असा सवाल या शेतकऱ्याने केला होता. वाचा सविस्तर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.