आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाला गती:हिंगोली शहरात रेल्वेगेट दोन महिन्यांसाठी बंद

हिंगाेली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली येथील खटकाळी रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाला गती आली आहे. ७२ मीटर लांबीचा लोखंडी पूल सरकवण्याच्या कामासाठी तब्बल ८ ऑक्टोबरपासून दोन महिने रेल्वेगेटवरून वाहतूक बंद होणार आहे. वाहनांसाठी पर्यायी व्यवस्था केली.

हिंगोली खटकाळी रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू असून हे काम मार्चअखेरपर्यंत पूर्ण करण्याची डेडलाइन देण्यात आलेली आहे. त्यानुसार कामाला गती आली आहे. रेल्वेरुळाच्या वरील भागावर ७२ मीटर लांबीचा लोखंडी पूल उभारला जाणार आहे. या पुलाचे काम बाजूलाच करण्यात आले. त्यानंतर हा लोखंडी पूल सरकवून रेल्वेरुळाच्या वरील भागात बसवला जाणार आहे. त्यासाठी कंत्राटदारांनी रेल्वेगेट बंद करण्याची परवानगी मागितली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी परवानगी दिली. त्यानुसार रेल्वेगेटवरून होणारी वाहनांची वाहतूक पुढील दोन महिन्यांसाठी बंद केली जाणार आहे. दोन महिन्यांत या ठिकाणी पुलाची जोडणी केली जाणार असून त्यासाठी आवश्यक त्या वेळी ४ तासांचा रेल्वे ब्लॉकदेखील घेतला जाईल.

बातम्या आणखी आहेत...