आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक:एक ठार, दोघे गंभीर जखमी; कामठा फाटा येथे अपघात

प्रतिनिधी | हिंगोली24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आखाडा बाळापुर ते कळमनुरी मार्गावर कामठा फाटाजवळ दुचाकीस अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात एक जण ठार, तर दोघेजण गंभीर जखमी झाले.

अपघातात अफरोजोद्दीन सिद्दिकी (वय 38, रा. कळमनुरी ) या तरुणाचा मृत्यू झाला. सोमवारी पहाटे 4 च्या सुमारास हा अपघात झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी येथील अफरोजोद्दीन सिद्दिकी हे त्यांचे मित्र बबलू सिद्दिकी व मुजबोद्दीन खतीब ( रा. येलकी) यांच्यासह दुचाकीने रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास कळमनुरीकडून येलकी गावाकडे येत होते.

त्यांची दुचाकी आखाडा बाळापुर ते कळमनुरी मार्गावर कामठा फाट्याजवळ आली असता भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. अपघातामध्ये दुचाकीवरील तिघेही गंभीर जखमी झाली. अपघातानंतर वाहनचालकाने वाहनासह पळ काढला.

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, जमादार गजानन मुटकुळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमींना उपचारासाठी वाहनाने आखाडा बाळापुरच्या ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र, अफरोजोद्दीन सिद्दिकी यांचा मृत्यू झाला. तर, बबलू सिद्दिकी व मुजबोद्दीन खतीब यांच्यावर आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेडला हलवण्यात आले.

दरम्यान, पोलिसांनी अपघाताचा तपास सुरू केला आहे. रस्त्यावरील दुकानावर असलेल्या सीसी टीव्ही फुटेजच्या माध्यमातून वाहनाची ओळख पटविण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...