आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली अपघात:हिंगोलीत वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या टेंपोचा अपघात; आठ जण जखमी, तर चौघांची प्रकृती गंभीर

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोलीतील आजेगाव ते गोरेगाव मार्गावर गोटवाडी शिवारात लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणारा टेंपोचा अपघात झाल्याने आठ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी चौघांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी हिंगोलीच्या लक्ष्मी लाईफ केअर हॉस्पीटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. सोमवारी (ता.6 ) सकाळी साडेदहा वाजता ही घटना घडली आहे.

नियंत्रण सुटल्याने झाला अपघात

याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथील वऱ्हाडी मंडळी पिकअप व्हॅनने लग्नासाठी गोरेगाव येथे जात होते. यावेळी आजेगाव ते गोरेगाव मार्गावर गोटवाडी शिवारात अचानक एक दुचाकी वाहन पिकअप व्हॅनच्या समोर आली. त्यामुळे चालकाने ब्रेक दाबल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले अन व्हॅन रस्त्याच्या खाली जाऊन उलटली. या अपघातामध्ये व्हॅनमधील शेख इमरान, शेख करीम, शेख समीर, शेख अमन, सोहिल कुरेशी, निलेश दळवी, शेख बशीर, शेख इर्शाद हे जखमी झाले.

गुन्हा दाखल नाही

या अपघातातील जखमींना परिसरातील नागरीकांनी व्हॅन बाहेर काढून उपचारासाठी तातडीने हिंगोलीला हलवण्यात आले. हिंगोली येथील लक्ष्मी लाईफ केअर हॉस्पीटलमध्ये डॉ. अखील अग्रवाल, डॉ. संदीप इंगळे, डॉ. मंगेश मुंडे, डॉ. मयुर अग्रवाल यांच्या पथकाने त्यांच्यावर उपचार केले असून जखमींपैकी चौघांच्या डोक्याला गंभीर दुखापत असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणी गोरेगाव पोलिस ठाण्यात अद्याप पर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.

बातम्या आणखी आहेत...