आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुग्णवाहिका- हायवाच्या धडकेत 2 ठार, 5 जखमी:अपघातग्रस्ताला उपचारासाठी नेताना दुसरा अपघात, डोंगरकडा- नांदेड मार्गावर दुर्घटना

हिंगोली7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डोंगरकडा ते नांदेड मार्गावर हिवरा पाटीजवळ रुग्णवाहिका व हायवा ट्रक यांच्यात झालेल्या धडकेमध्ये रुग्णवाहिकेच्या चालकासह अन्य एकाचा मृत्यू झाला असून अन्य पाच जण जखमी झाले आहेत. जखमीपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले. मंगळवारी (ता. 22) सायंकाळी हा अपघात झाला आहे.

पहिल्या अपघातात ऑटो धडकला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील हिवरा येथील किसन गोवंदे यांना एका ऑटोने धडक दिल्याने ते जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी डोंगरकडा येथे आणण्यात आले होते. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना डोंगरकडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेने पुढील उपचारासाठी नांदेड येथे नेले जात होते.

रुग्णवाहिका चालकाचा मृत्यू

डोंगरकडा येथून निघालेली रुग्णवाहिका काही अंतरावर असलेल्या हिवरा फाट्याजवळ गेली असताना समोरून येणाऱ्या हायवा ट्रकची रुग्णवाहिकेला जबरदस्त धडक बसली. या अपघातात रुग्णवाहिकेचा चालक बळीराम वाघमारे (रा. डोंगरकडा) यांचा जागीच मृत्यू झाला. तर रुग्णवाहिकेतील इतर सहा जण गंभीर जखमी झाले.

अपघात झाल्याची माहिती मिळताच आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, जमादार शेख बाबर, प्रभाकर भोंग यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

जखमींवर नांदेडमध्ये उपचार

पोलिसांनी सर्व जखमींना दुसऱ्या वाहने उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले. मात्र, रस्त्यावर किशन गोवंदे यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. तर उर्वरीत पाच जणांना नांदेड येथे उपचारासाठी दाखल केले आहे. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...