आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:कन्नड मार्गावर अपघात;‎ एक ठार , 5 जण जखमी‎

हिंगोली‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती संभाजीनगर ते कन्नड‎ ‎ मार्गावर‎ ‎ दुचाकीस्वाराला‎ ‎ वाचविण्यासाठी‎ ‎ कारचे ब्रेक‎ ‎ दाबल्याने कार‎ ‎ उलटून झालेल्या‎ ‎ अपघातात औंढा‎ ‎ नागनाथ येथील‎ एक जण ठार तर पाच जण जखमी‎ झाले आहेत. ७ एप्रिल‎ सायंकाळच्या सुमारास हा अपघात‎ घडला. मीनाताई तेजकुमार झांजरी‎ (६०, रा. औंढा नागनाथ) असे‎ मृताचे नाव असल्याचे सांगण्यात‎ आले आहे.‎ याबाबत सूत्रांनी दिलेल्या‎ माहितीनुसार, औंढा नागनाथ‎ येथील झांजरी कुटुंबातील चौघे‎ जण शुक्रवारी दुपारी कारने कन्नड‎ येथे नातेवाइकाच्या अंतिम‎ संस्कारासाठी जात होते. सायंकाळी‎ पाच वाजण्याच्या सुमारास त्यांची‎ कार कन्नडजवळ पोहोचली‎ असताना अचानक दुचाकीस्वार‎ कारसमोर आला. या वेळी त्याला‎ वाचविण्याच्या प्रयत्नात कार‎ चालकाने कारचे ब्रेक दाबले. या‎ वेळी चालकाचे कारवरील नियंत्रण‎ सुटल्यामुळे कार रस्त्याच्या खाली‎ जाऊन उलटली.‎ या अपघातात कारमधील मीनाताई‎ तेजकुमार झांजरी यांचा मृत्यू‎ झाला, तर तेजकुमार झांजरी,‎ जयकुमार झांजरी, मीना जयकुमार‎ झांजरी, मंजूषा झांजरी व चालक‎ किरण सोळंके हे जखमी झाले. या‎ अपघाताची माहिती मिळाल्यानंतर‎ त्यांच्या नातेवाइकांनी घटनास्थळी‎ धाव घेतली. अपघातातील‎ जखमींना उपचारासाठी रुग्णालयात‎ दाखल करण्यात आले आहे.‎