आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्येची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर पुण्यात अत्याचार:आरोपीला नांदेडमधून अटक; पोलिसांनी मुलीला कुटुंबीयांकडे केले स्वाधीन

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली कळमनूरी तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नांदेड येथे तरुणी आपल्या नातेवाईकांकडे गेली असता तिथे एका तरुणाशी तिची ओळख झाली. मात्र, त्यांचा संपर्क सुरुच होता. तसेच तरुणी आपल्यागावी परतल्यानंतर त्याने तिला धमकी देवून पुण्यात नेऊन अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला.

दरम्यान, घडलेल्या प्रकाराची संपूर्ण माहिती तरुणीने आखाडा पोलिसांत कळवली, व त्यानुसार तक्रार दाखल करण्यात आली. दिलेल्या तक्रारीवरुन नांदेड पोलिसांनी शेख अरबाज उर्फ बाबू शेख जुबेर (रा. गोपाळनगर, सावंगी, नांदेड) यास पोलिसांनी सोमवारी (31 ऑक्टोबरला) रात्री अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील रुपूर येथील एक अल्पवयीन मुलगी काही दिवसांपुर्वी नांदेड येथे तिच्या नातेवाईकांकडे गेली होती. त्या ठिकाणी तिची शेख अरबाज याच्याशी ओळख झाली. त्यानंतर ते मोबाईलवर बोलून लागले. मात्र नातेवाईकांकडून रुपुर येथे परत आल्यानंतर शेख अरबाज याने त्या मुलीशी संभाषण सुरुच ठेवले. मुलगी आपल्या जाळ्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने ता. 23 जूलै 2022 रोजी त्या मुलीला व्हिडीओ कॉल करून तु माझ्या सोबत आली नाही तर इमारतीवरून उडी मारून आत्महत्या करतो अशी धमकी दिली.

दरम्यान, त्या मुलीच्या कुटुंबियांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात दिली. यावरून सहाय्यक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, उपनिरीक्षक शिवाजी बोंडले यांच्या पथकाने त्या मुलीचा शोध सुरू केला. पोलिसांनी नांदेड येथे जाऊन माहिती घेतली असता तिला शेख अरबाज याने पळवून नेल्याचे स्पष्ट झाले. दोन दिवसांपुर्वीच दोघेही नांदेडला आल्यानंतर पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले.

यावेळी मुलीने दिलेल्या जबाबात शेख अरबाज याने आत्महत्येची धमकी देऊन पळविले. त्यानंतर पुणे येथे नेऊन अत्याचार केला. तसेच तेथून कोणाशीही संपर्क करू दिला नाही वर मारहाण देखील केल्याचे नमुद केले. मुलीला तिच्या कुटुंबियांच्या हवाली केले. पोलिस उपाधिक्षक किशोर कांबळे पुढील तपास

बातम्या आणखी आहेत...