आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस प्रशासनाचा दणका:हिंगोली शहरात 11 गुन्हे करणारा आरोपी एमपीडीए अंतर्गत 1 वर्षासाठी स्थानबद्ध

हिंगोली11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली शहरात विविध ११ गुन्हे करणाऱ्या आरोपीस एमपीडीए कायद्यांतर्गत १ वर्षासाठी स्थानबध्द करण्यात आले असून पोलिस अधिक्षकांच्या प्रस्तावानंतर जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी ता. १० याबाबतचे आदेश काढले आहेत.

हिंगोली शहरासह जिल्हाभरात गुन्हेगारांवर कडक कारवाई केली जात आहे. जिल्हयात दोन किंवा त्यापेक्षा अधिक गुन्हे असलेल्या गुन्हेगारांचे तडीपारीचे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश पोलिस अधिक्षक जी. श्रीधर यांनी ठाणेदारांना दिले आहेत. त्यानुसार आता पर्यंत २० पेक्षा अधिक गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.

त्यानंतर जिल्हयात शरिराविरुध्द गुन्हे असलेल्या गुन्हेगारांची माहिती सादर करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार जिल्हयातील पोलिस ठाण्यांनी या संदर्भात प्रस्ताव सादर केले आहेत. त्यावरून पोलिस अधिक्षक जी. श्रीधर यांनी यापुर्वी एकूण ८ जणांची चौकशी करून एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्ध करण्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर केला होता. त्यावरून जिल्हा प्रशासनाने आठ जणांवर स्थानबद्धतेची कारवाई केली आहे.

दरम्यान, हिंगोली शहरात खुनाचा प्रयत्न करणे, हत्यार घेऊन फिरणे, मारहाण करणे यासारखे विविध ११ गंभीर गुन्हे दाखल असलेल्या निखील डोरले याच्या विरुध्द कारवाई करण्याचा प्रस्ताव हिंगोली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सोनाजी आम्ले यांनी दिला होता. त्यावरून पोलिस उपाधिक्षक विवेकानंद वाखारे यांनी चौकशी करून पोलिस अधिक्षक जी. श्रीधर यांच्याकडे अहवाल सादर केला. त्यानंतर निखील याच्या स्थानबद्धतेचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे सादर केला होता. त्यावरून आज जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निखील डोरले याच्या स्थानबध्दतेचे आदेश काढले असून पोलिसांनी त्यास पकडून परभणी कारागृहात हलविले आहे.

बातम्या आणखी आहेत...