आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साडेनऊ लाखांचा 38 किलो गांजा जप्त:औंढा नागनाथ येथे कारवाई, लोहमार्ग पोलिस कर्मचाऱ्यासह तिघांवर गुन्हा

हिंगाेलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

औंढा नागनाथ येथील शासकीय विश्रामगृहाजवळ एका कारच्या तपासणीत ९.६५ लाखांच्या ३८ किलो ६०० ग्रॅम गांजासह १४.६५ लाखांचा ऐवज जप्त केला. याप्रकरणी तिघांवर औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुरुवारी (२ मार्च) रात्री गुन्हा दाखल झाला. आरोपींमध्ये पूर्णा लोहमार्ग चौकीच्या पोलिस कर्मचाऱ्याचा समावेश आहे.

परभणीकडून एका कारमध्ये आैंढा मार्गे हिंगाेलीकडे गांजा वाहतूक केली जाणार असल्याची माहिती पोलिसांंना मिळाली होती. त्यावरून पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक पंडित कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, जमादार संभाजी लकुळे, गजानन पोकळे, गणेश लेकुळे आदींच्या पथकाने गुरुवारी दुपारपासून औंढा नागनाथ ते हिंगोली व औंढा नागनाथ ते परभणी मार्गावर वाहनांची तपासणी सुरू केली. सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास औढा नागनाथ येथील शासकीय विश्रामगृहाजवळ एक कार उभी हाेती. पोलिसांनी कारसह तिघांना ताब्यात घेऊन औंढा नागनाथ पोलिस ठाणे गाठले. त्या ठिकाणी पोलिस निरीक्षक विश्‍वनाथ झुंजारे यांच्या मार्गदर्शनाखाली कारची तपासणी केली असता त्यामध्ये खाकी रंगाची १४ पाकिटे दिसून आली. यात ३८ किलो ६०० ग्रॅम गांजा असल्याचे उघड झाले. पोलिसांनी गांजा व कार जप्त केली. याप्रकरणी शेख गौस शेख पाशा (रा. पूर्णा), रवींद्र अमरसिंह राठोड (रा.वाशिम, नोकरी लोहमार्ग पोलिस चौकी, पूर्णा), शेख मईनोद्दीन शेक अलिमुद्दीन (रा. पूर्णा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

गांजाचा शोध सुरू पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली. यात त्यांनी गांजा आणला कुठून तसेच कुठे नेला जात होता, याची माहिती घेण्यात सुरुवात केली असून यामध्ये लोहमार्ग चौकीचा कर्मचारी असल्याने यापुर्वी रेल्वेने गांजाची तस्करी केली जात होती काय, याची माहिती घेतली जात असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...