आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

356 आरोग्य केंद्रांमध्ये अग्निरोधक यंत्र:मराठवाड्यात रुग्णांना सुरक्षा देण्यासाठी 1501 उपकेंद्रांमध्येही राबवणार उपक्रम

हिंगोली23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाड्यातील ३५६ प्राथमिक आरोग्य केंद्रांसह १५०१ उपकेंद्रांत सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अग्निरोधक यंत्र बसवले जाणार आहे. आठवड्यातून एक दिवस मॉकड्रिलदेखील केली जाईल. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून हा खर्च केला जाणार आहे. मराठवाड्यात आरोग्य संस्थांचे बळकटीकरण केले जात आहे. त्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रांसह आरोग्य उपकेंद्रात पुरेशा आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची उपलब्धता करण्यात आली आहे. याशिवाय ग्रामीण भागातदेखील रुग्णांना तातडीने आरोग्यसेवा मिळावी यासाठी आरोग्य उपकेंद्रातदेखील वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. याशिवाय वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुख्यालयी राहून आरोग्यसेवा देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, त्यानंतर आता प्राथमिक आरोग्य केंद्रासोबतच आरोग्य उपकेंद्रांमधून आगीच्या घटना रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी सर्व ठिकाणी फायर ऑडिट केले जाणार आहे. या संदर्भातील सूचनाही आरोग्यसेवा संचालक कार्यालयाने दिल्या आहेत. फायर ऑडिट केल्यानंतर संबधित संस्थेने सुचवलेल्या दुरुस्तीवर तातडीने निर्णय घेतला जाणार आहे. याशिवाय आरोग्य संस्थांमधून आवश्‍यक असलेल्या साहित्याची उपलब्धता करून घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

त्यानुसार मराठवाड्यातील ३५६ प्राथमिक आरोग्य केंद्रांमधून प्रत्येकी चार, तर १५०१ आरोग्य उपकेंद्रातून प्रत्येकी १ अग्निरोधक यंत्र बसवले जाणार आहे. यासाठी लागणारा निधी जिल्हा नियोजन समितीमधून खर्च केला जाईल. त्याबाबतची तरतूददेखील यात केली जाणार आहे. या संदर्भात केलेल्या कार्यवाहीच्या सूचनाही आरोग्य संचालक कार्यालयाकडे सादर करण्याबाबत सांगितले गेले आहे.

मराठवाड्यातील आरोग्य केंद्रे व उपकेंद्रे जिल्हा प्रा.आरोग्य केंद्र उपकेंद्र आैरंगाबाद ५१ १७९ परभणी ३१ २१५ हिंगोली २४ १३२ जालना ४० २११ उस्मानाबाद ४४ २१५ बीड ५२ २९७ लातूर ५० २५२

बातम्या आणखी आहेत...