आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धरणात पाणीसाठ्याची वाढ:नऊ वर्षांनंतर जुलै महिन्यात इसापूर धरणाचे 2 दरवाजे उघडले ; 768 क्युसेक विसर्ग

हिंगोली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इसापूर धरणात पाणीसाठा वाढल्याने शुक्रवार, दि. २९ जुलै रोजी पाच वाजता गेट क्रमांक सहा आणि दहा हे दोन गेट ३० सेंटी मिटरने उघडण्यात आले आहे. सद्यस्थितीत धरणाच्या सांडव्याची ७ वक्रव्दारे ३० सेमीने चालू असून, पैनगंगा नदीपात्रात सहा हजार ७६८ क्युसेक इतका विसर्ग सूरू आहे.मागील ९ वर्षांनंतर जुलै महिन्यात धरणाचे दरवाजे उघडावे लागले.

यवतमाळ जिल्ह्यातील इसापूर धरण यवतमाळ, हिंगोली व नांदेड जिल्ह्यासाठी महत्त्वाचे आहे. या धरणावर या तीन जिल्ह्यांतील सुमारे १.१० लाख हेक्टर शेती सिंचनाखाली येते. या धरणावर कळमनुरी शहराचा तसेच २५ गाव मोरवाडी योजनेचा पाणीपुरवठा अवलंबून आहेत. चालू वर्षात १ जूनपासून आजपर्यंत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ७३४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

यापूर्वी २०१३ मध्ये उघडले होते दरवाजे
जुलै महिन्यात दरवाजे उघडण्याची मागील नऊ वर्षांतील पहिलीच वेळ आहे. यापूर्वी २४ जुलै २०१३ मध्ये दोन दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करावा लागला होता. त्यानंतर गुरुवारी २ दरवाजे उघडले.

बातम्या आणखी आहेत...