आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

110 क्विंटल सोयाबीन चोरी प्रकरण:आखाडा बाळापूर येथील गोदामात चोरी करणाऱ्या 2 संशयितांच्या मुंबईतून मुसक्या आवळल्या

हिंगोली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आखाडा बाळापूर येथील गोदामातील सोयाबीन चोरी प्रकरणांमध्ये पोलिसांच्या पथकाने मुंबई येथून दोन जणांना गुरुवारी (ता. ६) अटक केली आहे. सदरील दोघेही मूळचे उत्तर प्रदेशातील असून मागील काही वर्षांपासून मुंबई येथे राहत असल्याचे पोलीस चौकशीत स्पष्ट झाले आहे.

आखाडा बाळापूर येथील बोल्डा रोड भागातील भुसार दुकानाचे गोदाम फोडून चोरट्यांनी 110 क्विंटल सोयाबीनचे पोते लांबवले होते. या प्रकरणाचा आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर दुसरेच दिवशी आणखी एक गोदाम फोडून चोरट्याने सोयाबीन पळवले होते.

या पोलीस अधीक्षक जी श्रीधर अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक पंडित कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपीनवार, जमादार संभाजी लकूळे, भगवान आडे, राजू ठाकूर, सुमित टाले, प्रमोद थोरात यांच्या पथकाने यापूर्वी तीन जणांना अटक केली होती. त्यांच्याकडून 40 क्विंटल सोयाबीन जप्त करण्यात आले होते. या प्रकरणात अन्य दोघांचा शोध सुरू होता.

दरम्यान आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, जमादार नागोराव बाभळे यांच्या पथकाने मागील दोन दिवसापासून मुंबई भागामध्ये शोधमोहीम सुरू केली होती. यामध्ये पोलिसांनी शफाहतउल्ला चौधरी उर्फ इरफान व शेर मोहम्मद इकबाल खान उर्फ शेरू या दोघांना भिवंडी परिसरातून अटक केली आहे. त्यांच्याकडून धान्य चोरी प्रकरणातील आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान दोन्हीही आरोपी मूळचे उत्तर प्रदेशातील रहिवासी असून मागील काही वर्षांपासून ते मुंबईत वास्तव्यात असल्याचे पोलीस चौकशीत स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्रासह तेलंगणा राज्यामध्ये त्यांनी गोदाम फोडून पळविल्याच्या अनेक घटना केल्याची शक्यता असल्याचेही पोलिसांनी सांगितले