आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:रुग्णवाहिका-हायवाची धडक;2 ठार, 5 जखमी, हिवरा पाटीजवळ घटना, दोघांची प्रकृती चिंताजनक

हिंगाेली7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डोंगरकडा ते नांदेड मार्गावर हिवरा पाटीजवळ रुग्णवाहिका व हायवा ट्रक यांच्यात झालेल्या धडकेत रुग्णवाहिकेच्या चालकासह अन्य एकाचा मृत्यू झाला. अन्य पाच जण जखमी झाले. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले. मंगळवारी (२२ नाेव्हेंबर) सायंकाळी हा अपघात झाला.

पोलिसांच्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील हिवरा येथील किसन गोवंदे यांना एका ऑटोने धडक दिल्याने ते जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी डोंगरकडा येथे आणण्यात आले होते. नंतर रुग्णवाहिकेने पुढील उपचारासाठी नांदेड येेथे नेले जात होते. डोंगरकडा येथून निघालेली रुग्णवाहिका काही अंतरावर असलेल्या हिवरा फाट्याजवळ गहायवा ट्रकची रुग्णवाहिकेला जबरदस्त धडक बसली. या अपघातात रुग्णवाहिकेचा चालक बळीराम वाघमारे (रा. डोंगरकडा) यांचा जागीच मृत्यू झाला. रुग्णवाहिकेतील इतर सहा जण गंभीर जखमी झाले. आखाडा बाळापूर ठाण्याचे सपोनि पंढरीनाथ बोधनापोड यांनी घटनास्थळी धाव घेतली.

बातम्या आणखी आहेत...