आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशातील वाढती महागाई थांबवून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करत अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करावी या मागणीसाठी हिंगोली जिल्ह्यात आमदार डॉक्टर प्रज्ञा सातव यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र आंदोलन करण्यात आले.
येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष नाना पटेल यांच्या सुचनेनुसार व आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांच्या नैतृत्वात हिंगोली जिल्ह्यात आंदोलन झाले आहे. हिंगोली येथे महात्मा गांधी चौकातून इंधन दरवाढीच्या निषेधार्थ हातगाड्यांमध्ये दुचाकी वाहन उभे करून हातगाडा ओढण्यात आला तसेच गॅस सिलेंडर डोक्यावर घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय गाठण्यात आले.
यावेळी मोदी सरकार व केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. केंद्रातील भाजप सरकारच्या मनमानी कारभारामुळे महागाईचा आगडोंब उसळला असतानाच जीवनाश्यक वस्तुंवरही जीएसटी लावून मोदी सरकार सर्वसामान्य जनतेला देशोधडीला लावू पहात आहे.
बेरोजगारीचा उच्चांक झाला असून तरुणवर्गाचे भवितव्य अंधारात आहे.महागाई, बरोजगारी व ढासळत्या अर्थव्यवस्थेला केंद्र सरकारची चुकीची धोरणे कारणीभूत असल्याचे आरोप करण्यात आला.
यावेळी दिलीपराव देसाई, अनिल नेनवाणी, सुरेश सराफ, तालुकाध्यक्ष शामराव जगताप, शेख नेहाल, केशव नाईक, काँग्रेस प्रवक्ता विलास गोरे, मुजीब कुरेशी, आरेफ लाला, बासीत मौलाना, विशाल घुगे,ओबिसी सेल जिल्हाध्यक्ष सुधिर राठोड, एनएसयुआय जिल्हाध्यक्ष शेख जूबेर,विठ्ठल जाधव,शेख एजाज,अक्षय डाखोरे,संतोष साबळे,शेख वाजीद,खाजा पठाण यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.