आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वानराची सुखरुप सुटका:हिंगोलीत मासोळी पकडण्याच्या जाळ्यात अडकलेल्या वानराच्या पिल्ल्याची प्राणी मित्रांनी केली सुखरूप सुटका

हिंगोली13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली शहरातील रिसाला बाजार येथे घराच्या छतावर ठेवलेल्या मासोळी पकडण्याच्या जाळ्यामध्ये अडकलेल्या वानराच्या पिल्लाची प्राणी मित्रांनी सुखरूप सुटका केली. पिल्लू हाती लागतात वानरांनी धूम ठोकली.

हिंगोली शहरातील रिसाला बाजार येथे सुरज कहार यांच्या घराच्या छतावर मासोळी पकडण्याच्या जाळ्या ठेवण्यात आले आहेत. सोमवारी ता.2 दुपारच्या सुमारास या जाळीमध्ये वानराचे पिल्लू अडकले. जाळीतुन बाहेर निघण्याचा प्रयत्न पिल्लू आणखीनच अडकून बसले. त्यामुळे त्या परिसरात वानरांनी चांगलाच आरडाओरडा सुरू केला.

दरम्यान सुरज कहार यांनी घराच्या छतावर बघितले असता त्या ठिकाणी वानराचे पिल्लू अडकलेले आढळून आले. त्यांनी तातडीने वन विभागाचे परिक्षेत्र अधिकारी विश्वनाथ टाक यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर टाक यांच्यासह परिमंडळ अधिकारी गणेश मिसाळ वनरक्षक पी.टी. केंदळे, रितेश भेराणे, सर्पमित्र विश्वंभर पटवेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली.

यावेळी पटवेकर यांनी घराच्या छतावर जाळ्यात अडकलेल्या वानराचा पिल्लाला खाली घेतले. त्यानंतर जाळी तोडून त्याची सुटका केली. खोलीच्या बाहेर आलेले पिल्लू बघताच वानरांनी त्यास सोबत घेऊन धूम ठोकली.

बातम्या आणखी आहेत...