आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजनावरांची तस्करी करताना कोडवर्डचा वापर केला जात असल्याची बाब संशयित आरोपींच्या चौकशीतून स्पष्ट झाली आहे. किती जनावरे गाडीमध्ये बसवले आहेत हे विचारण्यासाठी कितने बंदे बैठे है असे विचारले जात असून जनावरे तस्करी करणाऱ्यांच्या नावाऐवजी पिंट्या, सोन्या, राजा अशी नावे घेतली जात असल्याचेही समोर आले आहे.
जनावरांची वाहतूक करणाऱ्यां संशयितांनी वसमत पोलिसांवर दगडफेक केल्या प्रकरणात आरोपींना पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी पोलिसांनी रविवारी पहाटे एकाला अटक केली आहे. त्याच्या माध्यमातून आता इतर आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत.
पोलिसांनी आता जनावरे तस्करांची पाळेमुळे शोधण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील यांनी वसमत येथे ठाण मांडून पथके स्थापन केली आहेत.
लिमगाव शिवारातून एका कारमधून सदर पाचही आरोपी पळून गेल्याचे पोलिसांना कळल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारचालकाचा शोध घेतला. त्यावरून पोलिसांनी हट्टा शिवारातून येथून शेख मोहसीन नावाच्या तरुणाला अटक केली. त्याने सर्व आरोपींना परभणी कडे सोडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना दिली आहे. त्यावरून पोलिसांनी आता परभणी व जालना जिल्ह्याकडे आपला मोर्चा वळविला आहे.
दरम्यान पोलिसांनी घेतलेल्या अधिक माहिती मध्ये जनावरांची तस्करी करताना कोडवर्डचा वापर केला जात असल्याचे स्पष्ट झाले. किती जनावरे गाडीमध्ये बसवले आहेत हे विचारण्यासाठी कितने बंदे बैठे है असे विचारले जाते. तसेच जनावरे तस्करी करणाऱ्यांची पूर्ण नाव किंवा नाव घेतल्याचेही टाळले जाते पिंट्या, सोन्या, राजा अशी नावे घेतली जात असल्याचेही पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले.
मागील अनेक दिवसांपासून या भागातून जनावर तस्करीचा खेळ सुरू असल्याचेही स्पष्ट झाले असून पोलिसांनी आता मुख्य आरोपींना अटक करण्यासाठी कंबर कसली आहे. पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकांना आवश्यक त्या सूचना दिल्या जात आहेत.
चोरी केलेली जनावरे आंध्र व तेलंगणाकडे
मराठवाड्यातून विशेषत : हिंगोली, परभणी नांदेड या भागातून तसेच विदर्भातील वाशिम जिल्ह्यातून चोरी केलेली जनावरे रात्रीच्या वेळी आंध्र प्रदेशात तसेच तेलंगणात पाठवली जात असल्याची शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली आहे. रात्रीच्या वेळी प्रवासासाठी वापरली जाणारी वाहने देखील बाहेर जिल्ह्यातल्या वाहनांची क्रमांक टाकून वापरली जात असल्याचेही स्पष्ट होऊ लागली आहे.
पोलिस निरीक्षक चंद्रकांत कदम, गुन्हे शाखेचे निरीक्षक उदय खंडेराय, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, सुनील गोपीनवार, उपनिरीक्षक बाबासाहेब खार्डे, जमादार शंकर हेंद्रे, शिवाजी पतंगे, भगीरथ सवंडकर, प्रशांत मुंढे, गुन्हे शाखेचे संभाजी लेकुळे, गजानन पोकळे, सुनील अंभोरे, भगवान आडे, शेख शकील यांची पथके हिंगोली जिल्ह्यासह मराठवाड्यातील विविध भागात रवाना करण्यात आली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.