आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाराजांना राजी करण्याचे ठाकरे गटाचे प्रयत्न:हिंगोली जिल्ह्यात तालुका प्रमुखांसह उपजिल्हा प्रमुखपदी निष्ठावंतांच्या नियुक्त्या

प्रतिनिधी | हिंगोली17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली जिल्ह्यात नाराज निष्ठावंतांना पदे देऊन त्यांची नाराजी दुर करण्याचे प्रयत्न ठाकरे गटाकडून सुरू आहेत. त्यानुसार नाराजांची उपजिल्हा प्रमुख व तालुका प्रमुख पदावर वर्णी लावण्यात आली आहे.

नुकत्याच या नियुक्त्या या जाहीर करण्यात आल्या असून विशेष म्हणजे औंढा नागनाथ येथे दोन तालुका प्रमुखपदही देण्यात आले आहे.

हिंगोली जिल्ह्यात ठाकरे गटातील काही निवडीवरून निष्ठावंतांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे या निष्ठावंत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी बैठक घेतली. यावेळी त्यांनी इतर पदांच्या निवडीवर आक्षेप न घेता प्रत्येक तालुक्यासाठी पदाधिकाऱ्यांची निवड करण्याची मागणी केली होती. त्यानंतर पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे बैठकही झाली. बैठकीनंतर हिंगोली जिल्ह्यात ठाकरे गटाने आणखी नियुक्त्या केल्या आहेत.

वसमत विधानसभा मतदार संघासाठी सहसंपर्क प्रमुखपदी सुनील काळे, वसमत विधानसभासाठी उपजिल्हा प्रमुखपदी अनिल कदम, हिंगोली विधानसभेसाठी उपजिल्हाप्रमुख पदी परमेश्‍वर मांडगे, वसमत तालुका प्रमुखपदी बालाजी तांबोळी, वसमत विधानसभांतर्गत येणाऱ्या गावांसाठी औेढा तालुका प्रमुखपदी ज्ञानेश्‍वर झटे तर कळमनुरी विधानसभांतर्गत येणाऱ्या गावांसाठी औढा तालुका प्रमुखपदी गणेश देशमुख, औढा तालुका संघटकपदी राजू मुसळे, वसमत तालुका संघटक धोंडीराम पार्डीकर, औंढा शहर प्रमुख बंडू चोंढेकर, हिंगोली विधानसभा संघटक म्हणून उद्धव गायकवाड, वसमत विधानसभा संघटक देविदास कऱ्हाळे यांची नियुक्ती केली आहे.

दरम्यान, नाराजांना पदे देऊन त्यांना राजी करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे चित्र असून विधानसभानिहाय उपजिल्हा प्रमुख, सहसंपर्क प्रमुखांच्या निवडी करण्यात आल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...