आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियुक्ती:केंद्राच्या वित्त मंत्रालय अंतर्गत सयुक्त हिंदी सल्लागार समितीच्या सदस्यपदी हिंगोलीच्या प्रा. डॉ. वसंत गाडे यांची नियुक्ती

हिंगोली16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालय अंतर्गत आर्थिक कार्य विभाग, वित्तीय सेवा व लोक उद्यम विभागाच्या संयुक्त हिंदी सल्लागार समितीवर हिंगोली येथील डॉ. वसंत पुंजाजीराव गाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रा.डॉ.वसंत गाडे हे नागनाथ वरिष्ठ महाविद्याल औंढा येथे हिंदी विभाग प्रमुख आहेत. महाराष्ट्रातून या समितीवर त्यांची एकमेव नियुक्ती झाली आहे.

केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालय अंतर्गत हिंदी सल्लागार समितीचे पुनर्गठन करण्यात आले आहे या समितीमध्ये केंद्रीय अर्थमंत्री अध्यक्ष राज्यमंत्री उपाध्यक्ष असून लोकसभा व राज्यसभेचे नऊ सदस्य या समितीवर आहेत. या शिवाय केंद्राच्या गृह मंत्रालय, उद्योग विभाग, वित्त विभागातील सचिव व प्रमुख अधिकाऱ्यांचा पदसिद्ध सदस्य म्हणून समावेश आहे. या समितीवर आर्थिक कार्य विभागाकडून चार सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये हिंगोली येथील डॉ. वसंत पुंजाजीराव गाडे ( महाराष्ट्र), संगीत शर्मा (उत्तराखंड), पवन सागर (हरियाणा), डॉ. विचार दास (उत्तर प्रदेश) यांचा समावेश आहे. या समितीमध्ये नियुक्त करण्यात आले आहे

दरम्यान सदर समिती राजभाषा विभाग व गृहमंत्रालयाच्या निर्देशानुसार नियमांना अनुसरून सरकारी कामकाजामध्ये हिंदी भाषेचा प्रयोग व संबंधित कार्यासंदंर्भात या विषयावर केंद्रशासनाला सल्ला देण्याचे काम करणार आहे. महाराष्ट्रातून प्रा.डॉ. वसंत गाडे यांची एकमेव निवड झाली असून त्यांच्या निवडीबद्दल संस्थेच्या वतीने, महविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक व हिंगोली जिल्हावासियांनी अभिनंदन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...