आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत जोडो यात्रा:जणू राजूच घरी येत आहे ; माजी मंत्री रजनी सातव यांचे भावनिक वक्तव्य

हिंगोली5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत छोडो यात्रेच्या निमित्ताने खासदार राहुल गांधी यांच्या रूपाने माझा राजू घरी येत आहे, अशी भावना व्यक्त करत माजी मंत्री रजनी सातव यांनी अश्रूंना बांध मोकळा करून दिला. भारत जोडो यात्रा हिंगोली जिल्ह्यात पोहोचली असून शनिवारी रात्री खासदार राहुल गांधी कळमनुरी येथील मुक्कामी थांबणार आहेत. या वेळी ते माजी मंत्री रजनी सातव यांचीही भेट घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर बोलताना माजी मंत्री सातव म्हणाल्या की, आज राजीव असता तर खासदार राहुल गांधी यांचे आणखी भव्य स्वरूपात स्वागत केले असते. आबालवृद्धांचा उत्साह पाहण्याजोगा राहिला असता. मात्र दुर्दैवाने माझ्या राजूला नियतीने हिसकावून नेले. त्यांच्या आठवणी मी विसरू शकत नाही. राजीव सातव यांनी पक्षासाठी भरीव योगदान दिले, असेही सातव म्हणाल्या.

बातम्या आणखी आहेत...