आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांनी हिंगोली जिल्हा परिषदेतच भरवली शाळा

हिंगोली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेनगाव तालुक्यातील खैरखेडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षकाच्या नियुक्तीसाठी ग्रामस्थांनी बुधवारी विद्यार्थ्यांसह जिल्हा परिषद कार्यालय गाठून त्या ठिकाणीच शाळा भरवली. गावकऱ्यांचे निवेदन स्वीकारण्यासाठी शिक्षण विभागाचा एकही अधिकारी दुपारी चार वाजेपर्यंत आलाच नाही.

सेनगाव तालुक्यातील खैरखेडा येथे जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत शाळा आहे. या ठिकाणी ६० पेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. शाळेत ३ शिक्षकांची पदमान्यता आहे. मात्र २ शिक्षक कार्यरत असून एक शिक्षक प्रतिनियुक्तीवर आहे. त्यामुळे शाळेत शिक्षक वेळेवर येत नाहीत तसेच आल्यानंतर काही वेळातच निघून जात असल्याचा आरोप करण्यात आला.

खंडपीठाने फटकारल्यानंतरही परिस्थिती कायम हिंगोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेमधील अपुऱ्या शिक्षकांच्या प्रश्नावर “दिव्य मराठी’ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर खंडपीठाने सुमाेटाे याचिका दाखल करून घेत शिक्षण खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना नोटीस पाठवण्याची आदेश दिले होते. तसेच रिक्त पदांची माहिती घेतली होती. खंडपीठाच्या सूचनेनंतरही जिल्ह्यातील शाळांमधील शिक्षकांबाबत परिस्थिती सुधारली नसल्याचे यावरून दिसून येत आहे.

बातम्या आणखी आहेत...