आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Hingoli
  • At Least 20 Villages From Each Taluka Will Be Idealized On The Lines Of Ditegaon In Hingoli, Water Supply, Sanitation And Other Activities Will Be Implemented.

स्वच्छता अभियान:हिंगोलीत दाटेगांवच्या धर्तीवर प्रत्येक तालुक्यातून किमान 20 गावे आदर्श करणार, पाणीपुरवठा स्वच्छतेचे सोबतच इतर उपक्रमही राबवणार

हिंगोली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली जिल्ह्यात दाटेगावच्या धर्तीवर प्रत्येक तालुक्यातील किमान 20 गावे आदर्श गाव केले जाणार असून त्यासाठी सर्व यंत्रणा यांना सहभागी करून घेतले जाणार असल्याची माहिती स्वच्छ भारत अभियानाची उपमुख्य कार्यकारी अधिकारी आत्माराम बोंद्रे यांनी दिली आहे.

संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानाच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत हिंगोली जिल्ह्यातील दाटेगाव ग्रामपंचायतीने विभाग स्तरावर पहिला क्रमांक मिळवला यासोबतच सांडपाणी व्यवस्थापनामध्ये बोल्डावाडी ग्रामपंचायतने पुरस्कार मिळवला.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगूलवार यांच्या मार्गदर्शनाखाली पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने जिल्ह्यात मोठी कामगिरी केली आहे. पाच तालुक्यामधून स्वच्छते सोबतच सांडपाणी व्यवस्थापन व वृक्ष लागवडीवर जनजागृती केली जात असून त्यासोबतच प्राथमिक शिक्षणाच्या जागृतीवर भर दिला जात आहे.

दाटेगाव ग्रामपंचायतीच्या धर्तीवर प्रत्येक तालुक्यातील किमान 20 गावे आदर्श गाव करण्यासाठी प्रशासनाचा प्रयत्न आहे त्यासाठी पंचायत विभाग व महिला बालकल्याण विभागाची मदत स्थानिक पातळीवर घेतली जाणार आहे. याशिवाय गावकऱ्यांनाही या उपक्रमात सहभागी करून घेतले जाणार असून लोकसहभागातूनच स्वच्छ गाव सुंदर गाव केली जाणार असल्याचे बोंद्रे यांनी सांगितले.

दाटेगावात दि़ड हजार लोकसंख्येमागे 9 हजार झाडे
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत विभागस्तरावर प्रथम पारितोषिक मिळवलेल्या दाटेगाव ग्रामपंचायतीने आदर्श निर्माण केला आहे. ग्रामसेवक उत्तम आडे यांच्यासह गावकऱ्यांनी एकजुटीने प्रयत्न करून गावाचा कायापालट केला आहे. दि़ड हजार लोकसंख्येच्या या गावात गावकऱ्यांनी 9 हजार झाडे लावली आहेत. विशेष म्हणजे स्मशानभुमी मध्ये डब्बा पार्टी केली जाते. तसेच गावाच्या हालचालीवर सीसीटीव्ही कॅमेराची नजर आहे. राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे.

बातम्या आणखी आहेत...