आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासगी बसची रिक्षाला धडक:एक जण जागीच ठार; हिंगोलीतल्या जवळाबाजार ते हट्टा मार्गावर मध्यरात्रीची घटना

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोलीत जवळाबाजार ते हट्टा मार्गावर बाराशिव शिवारात भरधाव खासगी बसने रिक्षाला धडक दिली. या अपघातात रिक्षा चालक ठार झाल्याची घटना सोमवारी (ता. 6) मध्यरात्री घडली आहे. या प्रकरणी हट्टा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. सय्यद शोएब सय्यद जावेद असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

कसा झाला अपघात ?

पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली येथील बावनखोली भागातील सय्यद शोएब हे सोमवारी (ता. 6) रात्रीच्या सुमारास त्यांच्या रिक्षाने परभणी येथून हिंगोलीकडे येत होते. त्यांची रिक्षा बाराशिव शिवारात आला असताना जवळाबाजारकडून हट्ट्याकडे भरधाव वेगाने येणाऱ्या खासगी बस चालकाने समोरील वाहनाला कट मारुन रिक्षाला समोरून धडक दिली. या अपघातात सय्यद शोएब हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला.

गुन्हा दाखल करणे सुरू

अपघाताची माहिती मिळताच हट्टा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजेंद्र सरोदे, उपनिरीक्षक संदीप तावडे, जमादार भुजंग कोकरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमी झालेल्या सय्यद शोएब यांना गावकऱ्यांच्या मदतीने तातडीने हट्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहिर केले. दरम्यान, या अपघातानंतर अपघातग्रस्त बसमधील प्रवाशांना दुसऱ्या खासगी बसने पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

बातम्या आणखी आहेत...