आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोलीत गुटख्याची सर्रास विक्री:लाखो रुपयांच्या गुटख्याच्या तस्करीचा प्लॅन फेल! आखाडा बाळापुर पोलिसांनी ठोकल्या दोघांना बेड्या

हिंगोली10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड ते हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक करून आडमार्गाने कार मधून आणला जाणारा गुटखा आखाडा बाळापुर पोलिसांनी चिखली फाटा शिवारात पकडला. याप्रकरणी हिंगोली येथील दोघांवर शुक्रवारी (ता.13) गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी कार साडेआठ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. रसूल खान सिकंदर खान, शेख सिकंदर शेख मुजीब ( रा. हिंगोली ) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

हिंगोली जिल्ह्यांमध्ये मागील काही दिवसात बाहेर जिल्ह्यातून सर्रासपणे गुटखा विक्रीसाठी आणला जात आहे. विशेष म्हणजे कार व इतर वाहनांच्या माध्यमातून रात्रीच्या वेळी मुख्य रस्त्याने न येता आडमार्गाने गुटख्याची वाहतूक केली जात आहे.

हिंगोली येथील रसूल खान सिकंदर खान व शेख सिकंदर शेख मुजीब हे त्यांच्या कार मध्ये (एमएच -04-3320) विमल व इतर गुटख्याची ची सुमारे 70 पोती घेऊन मध्यरात्रीच्या सुमारास नांदेड कडून हिंगोली कडे निघाले होते. विशेष म्हणजे नांदेड ते हिंगोली या राष्ट्रीय महामार्गावर वाहन न आणता त्यांनी मनाठा पाटी, चिखली या आडमार्गाने वाहन आणले. त्यांचे वाहन पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास चिखली शिवारात आले होते.

मात्र याचवेळी आखाडा बाळापुर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, जमादार शेख बाबर गजानन मुटकुळे रविकांत हरकाळ यांचे पथक गस्तीवर होते. पोलिसांनी आडमार्गाने येणारी कार थांबवून चालक रसूल खान यांच्याकडे चौकशी सुरू केली. मात्र या चौकशीमध्ये चालक रसूल खान व शेख सिकंदर या दोघांनाही समाधानकारक उत्तर देता आले नाही. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी कारची तपासणी केली असता त्यामध्ये विमल व इतर कंपनीच्या गुटख्याची पोती आढळून आली.

पोलिसांनी सुमारे साडे तीन लाख रुपयांचा गुटखा व कार असा साडेपाच लाख रुपयांचा ऐवज जप्त करून आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यामध्ये आणला आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक बोधनापोड यांच्या तक्रारीवरून रसुल खान सिकंदर खान व शेख सिकंदर शेख मुजीब यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जमादार शेख बाबर पुढील तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...