आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक:कंजारा येथे अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार, छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी, तरुणावर गुन्हा दाखल

हिंगोली19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औंढा नागनाथ तालुक्यातील कंजारा येथे एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केला त्यानंतर छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी दिली. या प्रकरणात त्या मुलीच्या तक्रारीवरून एका तरुणाविरुद्ध कळमनुरी पोलिस ठाण्यात रविवारी ता.1 गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार औंढा तालुक्यातील कंजारा येथील पांडुरंग संभाजी कल्याणकर ( 22 ) या तरुणाचे गावालगत शेत आहे. या ठिकाणी शेतात आखाडा देखील आहे. शेताच्या बाजूला लागूनच घर असलेल्या एका अल्पवयीन मुलीसोबत पांडुरंग याची ओळख झाली. त्यानंतर त्याचे प्रेमात रुपांतर झाले. यावेळी पांडुरंग याने त्या मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. तसेच हिंगोली येथे तिला सोबत आणून याठिकाणीही तिच्यावर अत्याचार करण्यात आला. यावेळी त्या मुलीचे छायाचित्र काढण्यात आले. यापुढे माझ्या सोबत संबंध ठेव अन्यथा छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर त्या मुलीने हा प्रकार तिच्या कुटुंबियांना सांगितला. तिच्या कुटुंबीयांनी मुलीला सोबत घेत थेट कळमनूरी पोलीस ठाणे गाठले.

या ठिकाणी पांडुरंग कल्याणकर याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी पांडुरंग कल्याणकर याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस अधीक्षक यतिश देशमुख, कळमनुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सूनील निकाळजे, उपनिरीक्षक के. पी. सोनुळे यांच्या पथकाने गावात भेट देऊन पाहणी केली. गुन्हा दाखल होतात फरार झालेल्या पांडुरंगाचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे.

बातम्या आणखी आहेत...