आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔंढा नागनाथ येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जवळ एका पीक व्हॅन व आयशर टेम्पो मधून शंभर पोते गहू व 25 पोते तांदूळ स्वस्त धान्याच्या संशयावरून पकडला आहे. याप्रकरणी पाच जणांवर औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात रविवारी ता. १९ सायंकाळी उशिरा गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार औंढा नागनाथ येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार समोर आज सकाळी दोन वाहने उभी करण्यात आली होती. या वाहनांमधून स्वस्त धान्याचा तांदूळ व गहू असल्याची माहिती औंढा पोलिसांना मिळाली होती.
त्यावरून पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे, उपनिरीक्षक मुंजाजी वाघमारे, सहायक पोलीस उपनिरीक्षक अफसर आली, जमादार संदीप टाक यांच्या पथकाने चालकाकडे विचारणा केली असता त्याला गहू व तांदूळ याबाबत माहिती देता आली नाही. त्यामुळे पोलिसांनी सदरील धान्य स्वस्त धान्य दुकानाचे असल्याच्या संशयावरून पोलिसांनी दोन्ही वाहने ताब्यात घेऊन औढा पोलीस ठाण्यात आणून उभी केली. पोलिसांनी वाहनांची तपासणी केली असता आयशर वाहनांमध्ये 100 पोते गहू व पिक अप व्हॅनमध्ये 25 पोते तांदूळ आढळून आला. पोलिसांनी वाहन व धान्य असा सुमारे 11 लाख 55 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
या प्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अफसर अली यांच्या तक्रारीवरून औंढा नागनाथ पोलिसांनी मोहम्मद खाजा मोहम्मद अफजल, शेख वसीम शेख सलीम, शेख अजमत, शेख आहात शेख समद यांच्यासह अन्य दोघांवर जीवनावश्यक वस्तू कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे पुढील तपास करीत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.