आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीर्थक्षेत्र‎ विकासासाठी निधीची घोषणा‎:औंढा नागनाथला भक्तांना‎ सोयी-सुविधा मिळणार‎

हिंगोली12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎ देशातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या‎ औंढा नागनाथ येथे तीर्थक्षेत्र‎ विकासासाठी निधीची घोषणा‎ अर्थसंकल्पात गुरुवारी झाली. त्यामुळे‎ पुढील काळात या ठिकाणी‎ विकासकामे सुरू होणार आहेत.‎ त्यामुळे देशभरातून येणाऱ्या भाविकांना‎ सोयी‘सुविधा उपलब्ध होणार आहेत.‎ औंढा नागनाथ येथ‎ महाशिवरात्रीनिमित्त मोठी यात्रा भरते.‎ या वेळी रथोत्सव कार्यक्रम भाविकांचे‎ मुख्य आकर्षण असते. या‎ कार्यक्रमासाठी हजारो भाविक या‎ ठिकाणी येतात. याशिवाय श्रावण‎ महिन्यात मोठी यात्रा भरते. आषाढी‎ एकादशीनिमित्त विदर्भातून जाणाऱ्या‎ दिंड्या मंदिरात मुक्कामी थांबतात.‎

तीर्थक्षेत्र विकास योजनेतून निधी‎ मागणीचा प्रस्ताव जिल्हा नियोजन‎ समितीमार्फत शासनाकडे सादर केला‎ होता. यामध्ये ६० कोटींच्या प्रस्तावात‎ मंदिराच्या परिसरात पार्किंग व्यवस्था,‎ भाविकांना राहण्यासाठी भक्तनिवास,‎ डिजिटल लॉकर, उपाहारगृह, नियंत्रण‎ कक्ष, होमकुंड, बॅरिकेड‌्स, ऑपरेटर‎ रूम, सीसीटीव्ही कॅमेरे यासह इतर‎ बाबींचा समावेश होता. या प्रस्तावामुळे‎ अर्थसंकल्पाकडे लक्ष लागले होते.‎ राज्यातील ५ ज्योतिर्लिंगांसाठी ३००‎ कोटींचा निधी मंजूर केला आहे. यामध्ये‎ मराठवाड्यातील ३ ज्योतिर्लिंगांचा‎ समावेश आहे.‎

बातम्या आणखी आहेत...