आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिक्षाचालकाने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग:आखाडा बाळापुरातील घटना, चालकासह दोघांवर गुन्हा दाखल

प्रतिनिधी | हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आखाडा बाळापूर येथे ॲटो चालकाने एका अल्पवयीन विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. १९) रात्री गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी ॲटो चालकासह त्याच्या मित्राला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यांतर्गत कुपटी येथील एक विद्यार्थीनी आखाडा बाळापूर येथील शाळेत शिक्षण घेते. त्यासाठी ती ॲटोन कुपटी येथून दररोज ये-जा करते. विद्यार्थीनी ज्या अ‌ॅटोमध्ये ये जा करते त्या ॲटोचालक रिजवान खाँ याने तिच्यावर वाईट नजर ठेवण्यास सुरवात केली. तो वेळोवेळी तिला बोलण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र सदर मुलगी त्याच्याकडे दुर्लक्ष करू लागली होती.

दरम्यान, दोन दिवसांपुर्वी ॲटो चालकाने त्याच्या समीर खाँ नावाच्या मित्राला सोबत घेऊन त्या मुलीस चिठ्ठी देण्यास सांगितले. त्यावरून समीर याने मुलीला चिठ्ठी दिली. या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीने सदर प्रकार तिचा भाऊ व कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर तिच्या कुटुंबियांनी आज सायंकाळी थेट आखाडा बाळापूर ठाणे गाठून तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी ॲटो चालक रिजवान व त्याचा मित्र समीर याच्यावर गुन्हा दाखल केला.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सहाय्यक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शेख जावेद यांच्या पथकाने कुपटी शिवारातून दोघांनाही ताब्यात घेतले आहे.

बातम्या आणखी आहेत...