आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चॅलेंज:दादुड्या, कधी काढतोयस मिशी?, संतोष बांगरांना त्या आव्हानाची अयोध्या पौळ यांनी करुन दिली आठवण

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कळमनुरीच्या बाजार समिती निवडणुकीत 17 पैकी 17 जागा जर निवडून नाही आल्या, तर हा संतोष बांगर मिशा ठेवणार नाही, असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी केले होते. मात्र आता केवळ 5 जागा निवडून आल्यानंतर बांगर मिशा काढणार काय? असा खोचक सवाल ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी अयोध्या पौळ यांनी विचारला आहे.

नुकत्याच कृषी उत्त्पन्न बाजार समितीच्या निवडणुका पार पडल्या आहेत. अनेक ठिकाणी चुरशीची लढत पाहायला मिळाली. मात्र या निवडणुकांच्या प्रचारादरम्यानचा एक व्हिडिओ सध्या समोर येत आहे. नेहमीच वेगवेगळे वाद ओढवून घेणाऱ्या संतोष बांगर यांचा हा व्हिडिओ आहे.

काय म्हणाले बांगर?

संतोष बांगर या व्हिडिओमध्ये म्हणाले की, कळमनुरीत राष्ट्रवादी, उरलेली शिवसेना, काँग्रेस, वंचित हे सगळे एक झाले आहेत. पण आजही सांगतो, नागनाथाचे मंदिर समोर आहे. 17 पैकी 17 जागा जर निवडून नाही आल्या, तर हा संतोष बांगर या मिशा ठेवणार नाही. असे आव्हान संतोष बांगर यांनी विरोधकांना दिले होते.

संतोष बांगर यांना मोठा धक्का

मात्र नुकत्याच हाती आलेल्या निकालानंतर संतोष बांगर यांना मोठा धक्का बसला आहे, 17 पैकी केलळ 5 जागा राखण्यात बांगर यांना यश आले आहे. मात्र त्यांच्या या आव्हानावर अयोध्या पौळ यांनी चांगलीच खिल्ली उडवली आहे. पौळ यांनी शेव्हिंग रेझर दाखवत हे आपण संतोष बांगर यांना देण्यासाठी आणल्याचे त्यांनी सांगितले.

चॅलेंज द्यायची फार हौस

अयोध्या पौळ म्हणाल्या, दोन दिवसांपूर्वी मी हिंगोली दौऱ्यावर होते. माझ्या लाडका दादुड्याने तेव्हा पळ काढला. मी नागनाथाच्या मंदिरात जेव्हा गेले तेव्हाही त्याने पळ काढला. समोर येण्याची हिंमत करत नाही माझा दादुड्या. माझ्या दादुड्याला चॅलेंज द्यायची फार हौस आहे. कधी म्हणतो कानाखाली जाळ काढतो, तो काढलाच नाही.

नक्की काढ हं

अयोध्या पौळ म्हणाल्या, कधी म्हणतो माझ्या गाडीला टच करून दाखवा, त्यावरही काही करत नाही. दोन दिवसांपूर्वी तो माझ्यासमोर म्हणाला की 17 पैकी 17 जागांचं पॅनल निवडून नाही आणले, तर मी माझी मिशी काढतो. संतोष दादुड्या, कधी काढतोयस मिशी? नक्की काढ हं.