आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीषण अपघात:आखाडा बाळापूर ते कळमनुरी मार्गावर भरधाव ऑटोची बसला धडक, 8 जण जखमी, तिघांची प्रकृती गंभीर

हिंगोली25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आखाडा बाळापूर ते कळमनुरी मार्गावर माळेगाव शिवारात भरधाव अ्रॅटोने एसटीला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात ॲटोतील 8 जण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि.5) सकाळी साडेआकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. जखमींना कळमनुरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर असून त्यांना पुढील उपचारासाठी हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हदगाव तालुक्यातील उमरी जहाँंगिर येथील आठ जण ऑटोने एका कार्यक्रमासाठी कळमनुरीकडे येत होते. त्यांचा ॲटो आखाडा बाळापूर ते कळमनुरी मार्गावर माळेगाव शिवारात आला असतांना ऑटो समोरील एसटीला धडकला. या अपघातात ऑटो चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ऑटो उलटला.

जखमीत यांचा समावेश

या अपघातात कबीर हौसाजी कदम (75), अंजनाबाई साहेबराव पाईकराव (60), प्रितम साहेबराव पाईकराव (25), वंदना यशवंत पाईकराव (45), गोविंद कोंडबा पाईकराव (5), ममता प्रितम पाईकराव (20), रंजना गोविंद पाईकराव (40), प्रदिप यशवंत पाईकराव (15, सर्व रा. उमरी जहाँंगिर, ता. हदगाव, जि. नांदेड) हे जखमी झाले आहेत.

रुग्णालयात दाखल

या अपघाताची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्ग पथकाचे उपनिरीक्षक शेख उमर, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शैलेश मुदीराज, जमादार सय्यत तय्यब, गजानन ढाले, लावणारे, सातभाई, गजभार, जोगदंड यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन जखमींना रुग्णवाहिकेद्वारे कळमनुरीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद मेने, डॉ. संजय माहुरे यांच्या पथकाने तातडीने उपचार केले.

कळमनुरी ठाण्यात गुन्हा दाखल

दरम्यान, अपघातातील प्रदीप पाईकराव, कबीर कदम, ममता पाईकराव हे गंभीर जखमी असल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात हलविले आहे. या प्रकरणी अद्याप पर्यंत कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नाही.