आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Hingoli
  • Banks Are Reluctant To Give Loans To The Groups As They Are Not Getting Revolving Funds From The Maharashtra Government Under The Grameen Jeevanonnati Abhiyan

राज्यात 1.26 लाख बचत गट अडचणीत:ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महाराष्ट्र सरकारचा फिरता निधीच मिळत नसल्याने गटांना कर्ज देण्यास बँकांची टाळाटाळ

मंगेश शेवाळकर | हिंगोली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • निधीअभावी बँकांत खाती उघडण्यात अडचण, दुसरीकडे खाती न काढली गेल्याने बँकांतून कर्ज मिळणे कठीण

राज्यात महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत बचत गटांना फिरता निधीच मिळत नसल्याने १.२६ लाख बचत गट आर्थिक अडचणीत सापडले आहेत. निधी नसल्याने बँकेकडून गटांना कर्जही मिळत नाही. निधी नसल्याने बँकेकडून खाते उघडण्याचा खोडा घातला जात असल्याने बचत गटातील महिलांची आर्थिक कोंडी कायम आहे. राज्यात महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी जीवनोन्नती अभियानांतर्गत बचत गटांना शासनाकडून फिरता निधी दिला जातो. गटातील महिलांची बचत व फिरता निधी अशा रकमेवर बँकेकडून सहापट कर्ज दिले जाते. त्यातून बचत गट व्यवसाय सुरू करून महिला सक्षम होतात. मात्र त्यासाठी बँकेकडे खाते काढलेले असणे आवश्यक आहे.

आधी कोविडने गाठले, बचत गट आता निधीअभावी त्रासले कोविडमुळे गेल्या दोन वर्षांत फिरता निधीच मिळाला नाही. याचा बचत गटांना फटका बसला. या वर्षी अभियान कक्षाने राज्यातील १.६० लाख बचत गटांना २३२ कोटी फिरता निधी देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्याला उद्दिष्ट वाटून देण्यात आले. हा निधी मार्चअखेरपर्यंत वाटप होणे अपेक्षित आहे. मात्र सद्य:स्थितीत केवळ ३३३४७ गटांना ५० कोटी रुपयांचाच फिरता निधी वाटप करण्यात आला आहे. त्यामुळे १.२६ लाख गट फिरत्या निधीच्या प्रतीक्षेत आहेत.

अशी होते फिरत्या निधीची मदत 1 बचत गट स्थापनेनंतर तीन महिन्यांत १० ते १५ हजार रुपयांचा निधी दिला जातो. 2 यानंतर या रकमेवर बँकेकडून ६ पट कर्ज दिले जाते. या कर्जातून गट व्यवसायाला सुरुवात करतात. 3 गावपातळीवर ३ ते ६ महिन्यांपर्यंत गटांना फिरता निधी दिला जातो. 4 तालुकास्तरावरील कार्यालयाकडून जिल्हा कार्यालयाकडे प्रस्ताव गेल्यानंतर जिल्हा कार्यालयाकडून गटांच्या बँक खात्यावर फिरता निधी वर्ग होतो.

दुहेरी अडचण... राज्यात ७ हजारांहून अधिक बचत गटांचे मागील दोन ते सहा महिन्यांपासून बँकेत खातेच कढलेले नाही. यात बँकांकडून वेळोवेळी कारणे दिली जातात. दुसरीकडे खाती नसल्याने शासनाकडून दिला जाणारा फिरता निधी मिळत नाही.

बातम्या आणखी आहेत...