आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गद्दारांनो बापाच्या नावाच्या जागी बाळासाहेबांचे नाव लावा:शिंदे गटाला भास्कर जाधवांचे आव्हान; हिंगोलीत शिवसेनेचा मेळावा

हिंगोली22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेशी गद्दारी केल्यानंतरही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा वापर करणाऱ्या गद्दारांनी त्यांच्या बापाच्या नावाच्या जागेवर बाळासाहेबांचे नाव लावावे असे आव्हान शिवसेनेचे नेते माजीमंत्री भास्कर जाधव यांनी शिंदे गटाला सोमवारी (ता. 12) हिंगोली येथे दिले.

महात्मा गांधी चौकात शिवसेनेच्या वतीने मेळावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात, शिवसेना नेत्या ज्योती ठाकरे, माजी खासदार सुभाष वानखेडे, जिल्हा प्रमुख विनायक भिसे, संदेश देशमुख, डॉ. संतोष टारफे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

चाळीस गद्दारांनी धोका दिला

जाधव म्हणाले की, चाळीस गद्दारांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा विश्‍वासघात केला. शिवसेनेसोबत गद्दारी केली. त्यानंतरही त्यांच्याकडून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा नावाचा वापर केला जात आहे. शिवसेना पक्ष प्रमुख ठाकरे यांनी याबाबत विचारणा केली, तर भाजपाच्या काही चाणाक्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आमचेही नेते होते सांगितले.

तुमची निष्ठा बघायचीय

जाधव म्हणाले की, तुम्ही एवढेच प्रामाणिक आहात तर बापाच्या नावाच्या जागेवर बाळासाहेबांचे नाव लावावे आम्हाला वाईट वाटणार नाही. आम्हालाही तुमची निष्ठा बघायची आहे. केवळ आपले पाप लपविण्यासाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा वापर केला जात असल्याचा आरोप जाधव यांनी यावेळी केला.

आपण ठाकरेंचे दूत

जाधव म्हणाले की, शिवसेनेतून कोण बाहेर पडले याचा आता त्यांचा विचार करण्याची गरज नाही. आपण सर्व जण शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांचे दुत असून त्यांचे विचार गावपातळीवर पोहोचविण्याचे काम करावे.

यावेळी त्यांनी जिल्हयातील अवैध व्यवसाय सुरु असल्यामुळे पोलिसांच्या कार्यपध्दतीवर रोष व्यक्त केला. यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.

बातम्या आणखी आहेत...