आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आघाडीवर टीकास्त्र:राज्यसभा निवडणुकीतील विजयाचा भाजपकडून हिंगोलीत जल्लोष; पेढे वाटून साजरा केला आनंद

हिंगोली23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यसभा निवडणुकीत भाजपाचे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, माजी मंत्री डॉ‌ अनिल बोंडे‌, धनंजय महाडिक यांच्या विजयाचा हिंगोलीत शनिवारी (ता.11) भाजपच्या वतीने जल्लोष करण्यात आला. यावेळी फटाके फोडून मिठाई वाटप करण्यात आली.

हिंगोलीतील महात्मा गांधी चौकात आयोजित कार्यक्रमास भाजपचे जिल्हाध्यक्ष रामराव वडकुते, आमदार तानाजी मुटकुळे, माजी खासदार एडवोकेट शिवाजी माने, माजी आमदार गजानन घुगे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, प्रा. दुर्गादास साकळे, फुलाजी शिंदे, मिलिंद यंबल, प्रशांत सोनी गोल्डी, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष उमेश नागरे, संदीप वाकडे, पिंटू जाधव, हमीद प्यारेवाले, के. के. शिंदे, ॲड. अमोल जाधव, तालुकाध्यक्ष संतोष टेकाळे, उमेश गुठ्ठे, रजनीश पुरोहित, संजय घुगे, अमोल जाधव, सरंपच प्रवीण जाधव, मनोज शर्मा, माणिक लोडे, माजी सैनिक गजानन कावरखे, राजू यादव, शाम खंडेलवाल यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी भाजप नेत्यांनी मार्गदर्शन करताना शिवसेनेवर कडाडून टीका केली. महाराष्ट्रातील जनता महाविकास आघाडीवर नाराज आहे. त्यातच आता या निवडणुकीत आमदारांनी देखील महाविकास आघाडी वर नाराज असल्याचे दाखवून दिले. या निवडणुकीत भाजपचा विजय म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीतील विजयाची नांदी असल्याचे भाजप नेत्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...