आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणाचा मृतदेह सापडला:रामेश्वर तांडा येथून तीन दिवसांपासून होता बेपत्ता; मृत्यूचे कारण अद्यापही अस्पष्ट

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा येथून तीन दिवसापासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह डोंगरकडा शिवारामधील माळरानावर आढळून आला आहे. मृतदेहाची शनिवारी ( ता. 3) उत्तरीय तपासणी केली जात असून, मृत्यूचे कारण अद्यापही स्पष्ट झाली नाही.

काय आहे प्रकार ?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हादगाव तालुक्यातील पळसवाडी येथील मूळचे रहिवाशी असलेले प्रल्हाद बळीराम राठोड (वय 32) हे मागील काही दिवसांपासून रामेश्वर तांडा येथे राहतात. या ठिकाणी ते ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम करतात. दरम्यान ता. 31 ऑगस्ट रोजी ते घरातून औषधी आणण्यासाठी बाहेर जातो असे सांगून निघाले होते. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत ते परत आले नाही त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. मात्र त्यांची माहिती मिळाली नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात अर्ज दिला होता त्यावरून पोलिसांनी मिसिंग दाखल केली होती.

शेतात दुर्गंधी पसरली

शुक्रवारी (ता. 2) रात्रीच्या सुमारास माळरान परिसरामध्ये असलेल्या शेतकऱ्यांना दुर्गंधी येऊ लागली. त्यांनी पाहणी केली असता एक मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले. या घटनेची माहिती आखाडा बाळापूर पोलिसांना मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, उपनिरीक्षक श्रीधर वाघमारे, जमादार शेख बाबर, प्रभाकर भोंग, अमोल अडकिने यांच्या पथकाने रात्री अकरा वाजता घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता सदर मृतदेह प्रल्हाद राठोड यांचा असल्याचे स्पष्ट झाले.

पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी डोंगरकडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केला. आज दुपारी मृतदेहावर उत्तरे तपासणी केली जात होती. प्रल्हाद राठोड यांच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांची आत्महत्या की खून याचा उलगडा वैद्यकीय अहवालानंतर स्पष्ट होणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...