आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यूचे कारण अस्पष्ट:बेपत्ता तरुणाचा मृतदेह सापडला ; शनिवारी उत्तरीय तपासणी

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा येथून तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह डोंगरकडा शिवारामधील माळरानावर आढळून आला आहे. मृतदेहाची शनिवारी उत्तरीय तपासणी केली असून मृत्यूचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही.हादगाव तालुक्यातील पळसवाडी येथील मूळचे रहिवासी प्रल्हाद बळीराम राठोड (३२) हा काही दिवसांपासून रामेश्वर तांडा येथे राहतो. या ठिकाणी तो ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम करतो. दरम्यान, ३१ ऑगस्ट रोजी तो घरातून औषधी आणण्यासाठी बाहेर जातो असे सांगून निघाला होता. मात्र तो परत आला नाही, त्यामुळे कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. मात्र त्याची माहिती मिळाली नसल्याने त्याच्या कुटुंबीयांनी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात अर्ज दिला होता त्यावरून पोलिसांनी मिसिंग दाखल केली होती.

बातम्या आणखी आहेत...