आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'उत्पादन शुल्क'कडून डोळेझाक:हिंगोलीत किराणा दुकानातून देशीदारूच्या बाटल्या जप्त; आखाडा बाळापूर पोलिसांची कारवाई

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली कळमनुरी तालुक्यातील रेडगाव येथे एका किराणा दुकानावर आखाडा बाळापूर पोलिसांनी छापा टाकून देशीदारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणी एका जणाविरुध्द आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात बुधवारी सायंकाळी गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांच्या या कामगिरीमुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यपध्दतीवर शंका व्यक्त केली जात आहे.

बेकायदा विक्री सुरू

हिंगोली जिल्हयात बेकायदेशीर दारू विक्रेत्यांनी उच्छाद मांडला असून, ग्रामीण भागात सर्रासपणे उघड्यावर बेकायदेशीर देशीदारूची विक्री केली जात आहे. या सोबतच जिल्हयातील ढाबे व मुख्य रस्त्यालगतच्या हॉटेलमधूनही देशीदारूची विक्री होऊ लागली आहे. ग्रामीण भागातून दारू विक्रीमुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून अनेक गावांतून महिलांनी दारू विक्री बंद करण्याची मागणी केली आहे. मात्र, प्रत्येक वेळी यासाठी पोलिस विभागाला जबाबदार धरून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारभाराकडे डोळेझाक होऊ लागल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.

दरम्यान, कळमनुरी तालुक्यातील रेडगाव येथे एका किराणा दुकानातून देशीदारुची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून सहाय्यक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, जमादार शेख बाबर, शेख गौसोद्दीन यांच्या पथकाने बुधवारी ता. 1 दुपारी किराणा दुकानावर अचानक छापा टाकला.

20 बाटल्या केल्या जप्त

दुकानाच्या तपासणीमध्ये देशीदारूच्या सुमारे वीस बाटल्या आढळून आल्या आहेत. पोलिसांनी दारुच्या बाटल्या जप्त केल्या असून या प्रकरणी दुकानदार दयानंद हनवते याच्या विरुध्द आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...