आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घटना:गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी नदीत बुडून मुलाचा मृत्यू ; लालदेव येथील युवकाचा अंत

हिंगोली16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली तालुक्यातील घोटा येथे गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी कयाधू नदीच्या पाण्यात बुडून एका १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. पुरुषोत्तम संतोष गडगीळ असे मृत मुलाचे नाव आहे. त्याच्या पश्चात आई, वडील व दोन भाऊ असा परिवार आहे.

तरुण पाण्यात बुडून मृत्यू
नांदेड | नांदेड येथून जवळच असलेल्या भोपाळा (ता. नायगाव) येथील गणपती विसर्जन करण्यासाठी गेलेल्या गावातील तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. शिवकुमार बाबूराव हत्तीनगरे (२०) असे मृताचे नाव आहे.

लालदेव येथील युवकाचा अंत
जाफराबाद | विसर्जनावेळी नदीपात्रात पडलेल्या तिघांपैकी लाल देव फाटा येथील बळीराम बोबडे या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला तर दोघांना वाचवण्यात यश आले. जाफराबाद तालुक्यातील लाल देव फाटा येथील युवक हा विदर्भातील सिनगाव येथे विसर्जनासाठी गेला असताना हा प्रकार घडला.

बातम्या आणखी आहेत...