आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली कळमनुरी पालिकेचा लाचखोर मुख्याधिकारी निलंबित:रस्त्याच्या कामाच्या देयकासाठी घेतली होती 40 हजारांची लाच

हिंगोली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कळमनुरी येथे सिमेंट रस्त्याच्या कामाचे देयक काढण्यासाठी 40 हजाराची लाच घेतल्या प्रकरणी पालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी उमेश कोठीकर यांना निलंबीत करण्यात आले आहे. त्यांच्या निलंबनाचे आदेश नगरविकास विभागाने काढले असून, असे आदेश शुक्रवारी ता. 2 पालिकेला प्राप्त झाले आहेत.

कळमनुरी येथे पालिकेच्या वतीने एका कंत्राटदारामार्फत रस्त्याचे बांधकाम केले होते. तसेच कामाचे आठ लाख रुपयांचे देयक अदा करणे बाकी होती. त्यामुळे कंत्राटदाराने पालिका मुख्याधिकारी उमेश कोठीकर यांच्याकडे वारंवार देयकाची मागणी केली. मात्र कोठीकर याने त्यासाठी 40 हजार रुपयांची मागणी केली होती. त्यामुळे तक्रारदाराने हिंगोलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार केली होती.

त्यावरून लाचलुचपतचे उपाधिक्षक निलेश सुरडकर, पोलिस निरीक्षक प्रफुल्ल अंकूशकर, विजय पवार, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शेख युनुस, जमादार विजय उपरे, तानाजी मुंडे, राजाराम फुफाटे, ज्ञानेश्‍वर पंचलिंगे यांच्या पथकाने ता. 15 जुले रोजी सापळा रचून कोठीकर यास चाळीस हजाराची लाच घेतांना पकडले होते. या प्रकरणी कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

या प्रकरणात लाचलुचपत विभागाने या प्रकाराची सविस्तर माहिती नगरपालिका प्रशासन व शासनाकडे सादर केली होती. त्यावरून राज्याच्या नगर विकास विभागाने तत्कालीन मुख्याधिकारी उमेश कोठीकर यास निलंबीत केले आहे. त्याच्या निलंबनाचे आदेश आज पालिकेला प्राप्त झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...