आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खड्ड्यातील पाण्यात बुडून बहीण-भावाचा झाला मृत्यू:एकाच चितेवर​​​​​​​ करण्यात आले अंत्यसंस्कार

हिंगोली10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतीक्षा चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण - Divya Marathi
प्रतीक्षा चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा शिवारात खड्ड्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या सख्ख्या बहीण-भावावर बोरखेडी (ता. सेनगाव) येथे २३ जानेवारी एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

बोरखेडी येथील श्रावण आसाराम चव्हाण हे पत्नी वनिता चव्हाण, मुलगा पृथ्वीराज चव्हाण (७), मुलगी प्रतीक्षा चव्हाण (१०) हे नोव्हेंबर महिन्यात येरमाळा, करमाळा शिवारात ऊसतोडीसाठी गेले होते. दरम्यान, २२ जानेवारी राेजी दुपारी शेतात श्रावण व त्यांची पत्नी वनिता ऊसतोड करीत होते, तर पृथ्वीराज व प्रतीक्षा बाजूलाच खेळत होते. खेळताना पृथ्वीराजचा पाय घसरल्याने तो खड्ड्याच्या पाण्यात पडला. त्यानंतर प्रतीक्षाही पाण्यात पडली. यात दोघांचा मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...