आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहूल गांधींवर इडीची टाच:हिंगोलीत केंद्र सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन; काँग्रेस कार्यकर्ते अन् पोलिसांमध्ये झटापट

हिंगोली11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोलीत मोदी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्ते व पोलिसांमध्ये शुक्रवारी ता. 17 दुपारी चांगलीच झटापट झाली. त्यानंतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दोन ठिकाणी निदर्शने करुन रास्तारोको केला. त्यामुळे हिंगोली ते नांदेड व हिंगोली ते परभणी मार्गावरील वाहतुक दोन तास विस्कळीत झाली होती.

मोदी सरकारकडून हेतुपुरस्सर त्रास देत असल्याचा आरोप

काँग्रेस नेते राहूल गांधी यांना मोदी सरकारकडून हेतुपुरस्सर त्रास देत असल्याचा आरोप करीत काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हिंगोलीत मोदी सरकारच्या विरोधात निदर्शने केली. यावेळी आमदार डॉ. प्रज्ञा सातव, माजी आमदार डॉ. संतोष टारफे, जेष्ठ नेते मुनीर पटेल, माजी नगरसेवक अनिल नेनवाणी, माबूद बागवान, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. सतीष पाचपुते, कैलास साळूंके, केशव नाईक, विलास गोरे, जकी कुरेशी, दिलीप देसाई, विनायक देशमुख, सुरेश सराफ यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

रस्त्यावर ठाण मांडून आंदोलन

हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी 11 वाजता मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करुन सरकारचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी पोलिस प्रतिकात्मक पुतळा ताब्यात घेण्यासाठी पुढे येताच काँग्रेस कार्यकर्ते व पोलिसांमध्ये झटापट झाली. त्यानंतर सर्वपदाधिकारी अग्रसेन चौकात गेले. त्या ठिकाणी रस्त्यावर ठाण मांडून आंदोलन केले. तब्बल दोन तास चाललेल्या या आंदोलनामुळे हिंगोली ते नांदेड व हिंगोली ते परभणी मार्गावरील वाहतुक विस्कळीत झाली होती. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन त्यानंतर त्यांची सुटका केली.

बातम्या आणखी आहेत...