आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:गुटख्यासह कार जप्त; तिघांवर गुन्हा दाखल

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

औंढा नागनाथ ते शिरडशहापूर मार्गावर नागेशवाडी शिवारात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुटखा व कार असा ६.५७ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला असून याप्रकरणी तिघांवर हट्टा पोलिस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल झाला आहे. नांदेड येथून गुटखा हिंगोलीत आणला जात होता.

नांदेड येथून कारमधून गुटख्याची पोती हिंगोली येथे आणली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक राजेश मलपिल्लू, जमादार सुमीत टाले, शेख जावेद यांच्या पथकाने औंढा ते शिरडशहापूर मार्गावर वाहनांची तपासणी सुरू केली होती.

दरम्यान, रात्रीच्या सुमारास पोलिसांनी कारचालकास थांबविले. या वेळी पोलिसांनी कारचालक सय्यद अन्वर हुसेन याच्याकडे कारमधील पोत्याबाबत विचारणा केली असता त्याला समाधानकारक उत्तरे देता आली नाही. त्यामुळे पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन कारमधील पोत्यांची तपासणी केली असता त्यात गुटखा आढळून आला. पोलिसांनी कार व त्यातील गुटख्याची पोती असा ६.५७ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला. दरम्यान, गुटखा नांदेड येथील देगलूर नाका भागातील गोल्डन जर्दा स्टोअर्स या दुकानातून आणल्याचे कारचालकाने सांगितले. याप्रकरणी कारचालक सय्यद अन्वर हुसेन व नांदेड येथील शेख फहीम व शेख अकबर यांच्याविरुद्ध हट्टा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

बातम्या आणखी आहेत...