आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेड-कुर्ला विशेष रेल्वे बुधवारी सोडणार:हिंगोलीमार्गे मुंबईसाठी रेल्वे सोडण्याचा मार्ग मोकळा, प्रवाशांची मोठी सोय

हिंगोली12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोलीसह वाशिम, अकोला रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी नांदेड-कुर्ला विशेष रेल्वेला रेल्वे विभागाने हिरवा कंदील दाखवला असून बुधवारी (२५ जानेवारी) या रेल्वेची पहिली फेरी सोडली जाणार आहे. यामुळे अकोला मार्गावरील प्रवाशांची मुंबई येथे जाण्यासाठी सोय झाली आहे.

नागपूर येथून अकोला- औरंगाबादमार्गे कुर्ला रेल्वेगाडी सुरू होती. मात्र कोविडमुळे ही रेल्वेगाडी बंद करण्यात आली. कोविडनंतरही ही रेल्वेगाडी सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांची मोठी अडचण झाली होती. पूर्णा-वसमत-हिंगोली-अकोलामार्गे रेल्वेसेवा सुरू करावी, अशी मागणी वेळोवेळी करण्यात आली होती. मात्र त्याकडे रेल्वे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जाऊ लागले होते.

दरम्यान, प्रवाशांचा रोष लक्षात घेऊन आमदार तान्हाजी मुटकुळे, माजी आमदार गजानन घुगे, मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल, पत्रकार वसंत भट्ट, शेख नईम शेख लाल यांच्या शिष्टमंडळाने जालना येथे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली होती, तर सामाजिक कार्यकर्ते गणेश साहू, जेठानंद नेनवाणी, चंद्रशेखर निलावार यांनी रेल्वे विभागाकडे निवेदन देऊन पाठपुरावा सुरू केला होता. त्यानंतर आता रेल्वे प्रशासनाने नांदेड –कुर्ला या रेल्वेला हिरवा कंदील दाखवला आहे. नांदेड येथून बुधवारी रात्री ९.१५ वाजता रेल्वे सोडली जाणार आहे.

प्रवाशांची सोय परतीच्या प्रवासामध्ये ही रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस येथून गुरुवारी दुपारी ४.५५ वाजता सुटणार असून याच मार्गाने शुक्रवारी सकाळी ९ वाजता नांदेड येथे पोहोचणार आहे. या रेल्वेगाडीला १९ डबे असणार आहेत. उशिरा का होईना विशेष रेल्वेगाडी सुरू झाल्यामुळे हिंगोली-वाशिम- अकोला रेल्वे मार्गावरील प्रवाशांची सोय झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...