आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा''शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, मातोश्री व त्यांच्या परिवाराबद्दल नितांत आदर असून तो कायम राहील. आमची सुरुवातच शिवसेनेमुळे झाली असून त्यांच्या विचारधारेनुसारच आम्ही काम करणार आहोत. अशी स्पष्टोक्ती शिंदे गटाचे नेते आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी बुधवारी (ता. 1) पत्रकारांशी बोलताना दिली.
हिंगोली येथील महावीर भवन येथे बंजारा समाजाच्या मेळाव्याच्या निमित्ताने ते आले होते. यावेळी आमदार संतोष बांगर, युवासेनेचे जिल्हा प्रमुख राम कदम, वसमतचे तालुकाप्रमुख राजू चापके, संतोष राठोड यांची यावेळी उपस्थिती होती.
हिंदुत्वासाठीच उठाव बाकी सर्व अफवा
मंत्री संजय राठोड म्हणाले, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने चालणारे आम्ही शिवसैनिक असून त्यांनी आम्हाला हिंदुत्वा सोबतच अनेक गोष्टी दिल्या आहेत. हिंदुत्वाचा धागा पकडून आम्ही भाजपसोबत सरकार स्थापन केले आहेत. आमच्या उठावामागे केवळ हिंदुत्व हाच धागा असून बाकी सर्व अफवा असल्याचे त्यांनी सांगितले.
150 फुट उंचीचा सेवाध्वज
बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी येथे विकास कामांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 593 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीमधून या भागाचा विकास केला जाणार असून या ठिकाणी संत सेवालाल महाराज यांचा पंचधातूचा पुतळा उभारला जाणार आहे. तसेच 150 फुट उंचीचा सेवाध्वज उभारला जाणार आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभुमीवर मेळावे घेतले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
अर्थसंकल्पावर टीका हे विरोधकांचे कामच
केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना केंद्र बिंदू मानून शेती बाबत मोठी तरतुद करण्यात आली आहे. शेती उद्योगाला चालना देण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रयत्न असतो. अनेक वेळा त्यांनी मन की बात मध्ये हि बाब बोलून दाखवली आहे. सर्व समान्यांच्या गरजा ओळखूनच अर्थसंकल्पात विविध योजना हाती घेतल्या जातात. अर्थसंकल्पावर टिका करण्याचे कामच विरोधकांचे असते असे त्यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.